मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shiv Sena : आज दोन आमदार भांडतायंत, उद्या भाजप-शिंदे गट एकमेकांच्या उरावर बसतील; शिवसेनेचा हल्लाबोल

Shiv Sena : आज दोन आमदार भांडतायंत, उद्या भाजप-शिंदे गट एकमेकांच्या उरावर बसतील; शिवसेनेचा हल्लाबोल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 27, 2022 11:03 AM IST

Shivsena vs Shinde Group : युवा स्वाभिमान पार्टीचे आमदार रवि राणा आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद विकोपाला पोहचला आहे. त्यातच आता शिवसेनेनं शिंदे गटासह भाजपवर सडकून टीका केली आहे.

Bachu Kadu vs Ravi Rana
Bachu Kadu vs Ravi Rana (HT)

Bachu Kadu vs Ravi Rana : भाजपचे सहयोगी आमदार रवि राणा आणि शिंदे गट समर्थित आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद विकोपाला पोहचला आहे. ठाकरे सरकारमधून बाहेर पडण्यासाठी आमदार बच्चू कडूंनी पैसे घेतल्याचा आरोप रवि राणांनी केला होता. त्यानंतर आठ दिवसांत राणांनी पुरावे सादर करावेत नाही तर वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे. यावरूनच आता विरोधकांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका करायला सुरुवात केली आहे. रवि राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, आज सत्ताधारी पक्षाला समर्थन दिलेले दोन आमदार भांडत आहेत, उद्या भाजप आणि शिंदे गटाचे आमदार एकमेकांच्या उरावर बसून भांडतील, असं म्हणत खासदार विनायक राऊतांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी केवळ स्वार्थासाठी पक्षातून बंड केलं मात्र आता त्यांचा अपेक्षाभंग झाल्याचं विनायक राऊत म्हणाले.

बच्चू कडूंच्या मागे आमदार उभे करण्यामागे फडणवीसांचा हात- राष्ट्रवादी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवि राणांच्या आरोपांवर ठोस कारवाई करावी अन्यथा मी वेगळा निर्णय घेणार असल्याचं प्रहारचे आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत. याशिवाय सात ते आठ आमदार माझ्या संपर्कात असल्याचाही गौप्यस्फोट कडूंनी केला. त्यानंतर बच्चू कडू यांच्यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाच हात असल्याची टीका राष्ट्रवादीनं केली आहे. त्यामुळं आता राणा-कडूंच्या वादामुळं राज्यात राजकीय वादंग पेटलं आहे.

IPL_Entry_Point