मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : राज ठाकरे उद्धव ठाकरेंना म्हणाले स्वयंभू! संजय राऊत यांचं सणसणीत उत्तर

Sanjay Raut : राज ठाकरे उद्धव ठाकरेंना म्हणाले स्वयंभू! संजय राऊत यांचं सणसणीत उत्तर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 27, 2023 12:46 PM IST

Sanjay Raut attacks Raj Thackeray : उद्धव ठाकरे यांना स्वयंभू म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना संजय राऊत यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.

Sanjay Raut - Raj Thackeray
Sanjay Raut - Raj Thackeray

Sanjay Raut attacks Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा खासदार संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. 'आम्ही स्वयंभूच आहोत, शेंदूर फासलेल्या दगडांना तो मान मिळणार नाही, असं पलटवार राऊत यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली होती. या दोघांना तुम्ही काय सल्ला द्याल, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला होता. त्यावर, त्यांना मी काय सल्ला देणार? ते दोघेही स्वयंभू आहेत, असं राज म्हणाले होते.

Chandrapur: चंद्रपुरातील युवक हजारो प्रवाशांसाठी ठरला देवदूत; रेल्वे रुळ लुटल्याचे दिसताच त्याने...

संजय राऊत यांना याबाबत विचारलं असता त्यांनी राज यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली. 'आम्ही स्वयंभूच आहोत, म्हणून जनता आमच्या मागे आहे. शेंदूर फासलेल्या दगडांना किंवा इतरांनी देव बनवलेल्या दगडांच्या नशिबात ते भाग्य नसतं. अशांना कोणीही वाकून नमस्कार करत नाही. जे स्वयंभू असतात, त्यांनाच जनता श्रद्धेचा मान देते आणि तो ठाकरेंना मिळतो. त्यामुळं कुणाला पोटदुखी होत असेल तर त्यांनी सांगावं, त्यावर आमच्याकडं उपचार आहेत, असा चिमटाही राऊत यांनी काढला.

भीमा पाटस कारखान्यातील घोटाळ्याची चौकशी का नाही?

दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या भीमा पाटस कारखान्यात ५०० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप राऊत यांनी पुन्हा एकदा केला. त्याची चौकशी का होत नाही, असा सवाल त्यांनी केला.

Mumbai: मुंबईतील नेहरूनगरमध्ये महिला पोलीस उपनिरीक्षकाचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ!

बारसूत लोक मरायला तयार आहेत!

'बारसूमध्ये लोकांना विनाशकारी प्रकल्प नको आहे. ते मरायला आणि मारायला तयार आहेत. जमावबंदी आदेश लागू होऊनही लोक मागे हटायला तयार नाहीत. त्या जनभावनेचा आदर सरकार करणार नसेल तर लोकशाहीचा डंका कशाला पिटता?,' असा सवाल राऊत यांनी केला.

IPL_Entry_Point