मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gautami Patil : गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडिओची महिला आयोगाकडून दखल; रुपाली चाकणकर म्हणाल्या...

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडिओची महिला आयोगाकडून दखल; रुपाली चाकणकर म्हणाल्या...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 27, 2023 01:50 PM IST

gautami patil viral video : गौतमी पाटील कपडे बदलत असताना आरोपीनं चोरून व्हिडिओ शूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

gautami patil viral video on social media
gautami patil viral video on social media (HT)

gautami patil viral video on social media : अश्लिल नृत्य आणि हावभावानं वादात सापडलेली लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका कार्यक्रमात चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत असताना आरोपींनी तिचा व्हिडिओ शूट केला असून त्यानंतर त्याला सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. त्यानंतर आता या प्रकरणात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्यानंतर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक ट्वीट करत असे गैरप्रकार आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचं सांगितलं आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे की, लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील. महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगानं राज्याच्या पोलीस महानिरीक्षकांना कळवल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

सांगली, कोल्हापूर आणि पुण्यासह अनेक ठिकाणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांनी गोंधळ घातल्याच्या घटना समोर आलेल्या होत्या. याशिवाय एका कार्यक्रमात लावणी पाहण्यासाठी आलेल्या तरुणावर घराचं छत कोसळल्यानं त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळं अनेक संघटनांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता गौतमी पाटीलचा खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्यामुळं राज्यात खळबळ उडाली आहे.

IPL_Entry_Point