मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PMPML Strike : पुणेकरांची चिंता मिटली! पीएमपीएमएलचा संप अखेर मागे; सर्व बसेस रस्त्यावर

PMPML Strike : पुणेकरांची चिंता मिटली! पीएमपीएमएलचा संप अखेर मागे; सर्व बसेस रस्त्यावर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 07, 2023 04:43 PM IST

PMPML Strike called off : पीएमपीएमएलच्या चार कंत्राटदार रविवार पासून संपावर गेले होते. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली होती. दरम्यान, पीएमपीएमएल ६६ कोटी रुपयांची थकबाकी दिल्याने ही आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे.

पीएमपीएमएलचा संप अखेर मागे
पीएमपीएमएलचा संप अखेर मागे (HT)

पुणे : पालिकेकडून मिळणारी संचलन तूट आणि अन्य रक्कम पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी न दिल्यामुळे पीएमपीएमएलच्या ठेकेदारांनी अचानक संप पुकारल्याने प्रवाशांचे हाल झाले. तब्बल चार ठेकेदारांनी आपल्या बस गाड्या या उभ्या ठेवल्या होत्या. रविवारी आणि सोमवारी दोन दिवस बसगाड्या नसल्याने नागरिकांचे हाल झाले. दरम्यान, पीएमपीएमएलने चार कंत्राटदारांना सोमवारी रात्री ६६ कोटी रुपयांची थकबाकी दिल्याने या कंत्रातदारांनी अखेर संप मागे घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पीएमपीने भाडेकरार केलेल्या ४ खासगी ठेकेदारांनी रविवारी दुपारी पालिकेकडून ३ महिन्याचे देयक न मिळाल्याने संप पुकारला होता. अचानक त्यांनी गाड्या बंद केल्यामुळे पुणेकरांचे हाल झाले. पुणे आणि पिंपरीच्या ताफ्यात असलेल्या गाड्या न धावल्याने पालिकेच्या यंत्रणेवर ताण आला. पीएमपीने स्तत: च्या गाड्यांच्या जास्तीत जास्त फेऱ्या वाढवण्याचा प्रयत्न केला. यात सर्वाधिक त्रास झाला तो प्रवाशांना. बस फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना बस स्थानकावर गाड्यांची वाट पाहत बसावे लागले. या संपाचा फटका तब्बल आठ लाख प्रवाशांना बसला. दरम्यान ही थकीत असलेली ६६ कोटी रुपये देण्यात आले. त्यामुळे बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे असे पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले.

सोमवारी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख आणि संतोष नांगरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पीएमपीएमएलचे सीएमडी बकोरिया यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी निवेदनही दिलं होतं. त्यानंतर बकोरिया यांनी थकबाकी देऊन बससेवा पुर्ववत करण्याचे आदेश दिले.

IPL_Entry_Point

विभाग