मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Railway Mega block : पुणे-लोणावळा दरम्यान रेल्वेचा मेगा ब्लॉक! अनेक गाड्या रद्द

Railway Mega block : पुणे-लोणावळा दरम्यान रेल्वेचा मेगा ब्लॉक! अनेक गाड्या रद्द

Jan 27, 2024 08:54 PM IST

Pune-Lonavala Megablock : पुणे-लोणावळा दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार असून अनेक उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर काही एक्सप्रेस विलंबाने धावत आहेत.

Pune-Lonavala Megablock
Pune-Lonavala Megablock

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  अभियांत्रिकी आणि सिग्नल दुरुस्ती तसेच अन्य तांत्रिक कामांसाठी रविवारी (२८ जानेवारी) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  या ब्लॉकमुळे पुणे – लोणावळा दरम्यान अनेक लोकल रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत..

मेगा ब्लॉकमुळे पुण्याहून लोणावळ्याकडे जाणाऱ्या सकाळी ९.५७ वाजता सुटणारी, ११.१७ वाजता सुटणारी, दुपारी ३ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील. त्याचबरोबर शिवाजीनगरहून तळेगावसाठी दुपारी ३.४७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील. पुण्याहून लोणावळ्यासाठी सायंकाळी ४.२५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

शिवाजीनगरवरून लोणावळ्यासाठी सायंकाळी ५.२० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील. तसेच  लोणावळ्याहून शिवाजीनगरला जाणारी सकाळी १०.०५ वाजताची. लोणावळ्याहून पुण्याकडे सुटाणारी दुपारी २.५० वाजताची लोकल रद्द राहील. तळेगाव येथून पुण्याकडे सुटणारी ४.४० ची लोकल रद्द राहील. लोणावळ्याहून शिवाजीनगरला जाणारी सायंकाळी ५.३० वाजताची,  सायंकाळी ६.०८ वाजता सुटणारी तसेच पुण्याकडे सुटणारी सायंकाळी सात वाजताची लोकल रद्द राहील. याबरोबरच  एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस साडेतीन तास विलंबाने धावणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुणे - लोणावळा -पुणे दरम्यान लोकल गाड्या रद्द राहतील.

तपशील खालील प्रमाणे आहे:-

अप उपनगरीय गाड्या रद्द :-

1. पुण्याहून लोणावळा साठी 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01562 रद्द राहील.

2. पुण्याहून लोणावळा साठी 11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564 रद्द राहील.

3. पुण्याहून लोणावळा साठी 15.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01566 रद्द राहील.

4. शिवाजीनगरहून तळेगाव करीता 15.47 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01588 रद्द राहील.

5. पुण्याहून लोणावळा साठी 16.25 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01568 रद्द राहील.

6. शिवाजीनगर वरून लोणावळा करीता 17.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01570 रद्द राहील.

डाऊन उपनगरीय गाड्या रद्द :-

1. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559 रद्द राहील.

2. लोणावळ्याहून पुणे साठी 14.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561 रद्द राहील.

3. तळेगाव येथून पुणे साठी 16.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589 रद्द राहील.

4. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 17.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01565 रद्द राहील.

5. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी 18.08 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01567 रद्द राहील.

6. लोणावळ्याहून पुण्यासाठी 19.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01569 रद्द राहील.

मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल कृपया सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर