मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune fire : पुण्यात मार्केटयार्डमधील कागद-पुठ्ठा गोडाऊनला भीषण आग

Pune fire : पुण्यात मार्केटयार्डमधील कागद-पुठ्ठा गोडाऊनला भीषण आग

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 29, 2023 09:22 AM IST

Pune Market yard fire news : पुण्याच्या मार्केटयार्ड येथे कागद/पुठ्ठा असणाऱ्या गोडाऊनला मध्यरात्री भीषण आग लागली.

Pune Market yard fire news
Pune Market yard fire news

पुणे : पुण्यातील मार्केटयार्ड येथील कागद/पुठ्ठा गोडाऊनला मध्यरात्री १ च्या सुमारास भीषण आग लागली. हा घटनेत गोडाऊनमधील मोठा माल जळून भस्मसात झाला. अग्निशामक दलाच्या ९ बंब आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सध्या कूलिंगचे काम सुरू आहे. दरम्यान ही आग कशी लागली या बाबत माहितीमिळू शकली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Update : राज्यात पुढील ४८ तासांत 'या' भागात मुसळधार पूर्वमोसमी पाऊस बरसणार; मुंबई, पुण्याची स्थिती काय ?

मार्केटयार्ड परिसरात गोल मार्केट येथील एका कागद आणि पुठ्ठाच्या गोडाऊनला आग लागल्याची वर्दी मध्यराञी ०१•०५ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळाली. त्याचवेळी दलाकडून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, तब्बल ५००० स्क्वे.फुट गोडाऊनमधे कागद रद्दी व काही प्रमाणात पुठ्ठा असणाऱ्या मालाला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. ही आग एवढी भीषण होती की आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत होते. जवानांनी तातडीने गोडाऊनचा मुख्य दरवाजाचे बोल्ड कटरच्या साह्याने कुलुप तोडत चारही बाजूंनी पाण्याचा मारा सुरू करून आतमधे कोणी कामगार अथवा नागरिक अडकला नाही ना याची ही खाञी केली.

 

आग मोठी असल्याने जवानांना बचाव कार्यात अडथळे येत होते. यामुळे अतिरिक्त मदत मिळवण्यासाठी अधिक अग्निशमन वाहनांना बोलावण्यात आले. शेजारीच रहिवाशी इमारत असल्याने आग त्या दिशेने आग पसरु नये याची विषेश खबरदारी घेत पाण्याचा मारा सुरू ठेवत कर्मचाऱ्यांनी सुमारे तासाभरात आग आटोक्यात आणली. यावेळी गोडाऊनमधे असलेले रद्दीचे कागद पुर्णपणे जळाले. घटनास्थळी गोडाऊनमधे असलेले दोन टेम्पो ही जळाले. नुकसान व आगीचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी कोणी जखमी नाही.

IPL_Entry_Point

विभाग