मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune bypoll election : कसब्याच्या किंग मेकरची मैदानात उडी; व्हीलचेअरवरून एन्ट्री घेत बापटांचा प्रचार सुरू

Pune bypoll election : कसब्याच्या किंग मेकरची मैदानात उडी; व्हीलचेअरवरून एन्ट्री घेत बापटांचा प्रचार सुरू

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 16, 2023 10:42 PM IST

Pune kasba bypoll election : कसबा मतदार संघातून सर्वाधिक काळ आमदार गिरीश बापट यांची प्रकृती खराब असल्याने ते पोटनिवडणुकीपासून दूर होते. तसे पत्रही त्यांनी दिले होते. दरम्यान ते नाराज असल्याचे वृत्त होते. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची भेट घेत त्यांना समजावल्याने अखेर त्यांनी कसबा मतदार संघाच्या प्रचारात उडी घेत आपली पक्षनिष्ठा दाखवून दिली आहे.

Pune bypoll election
Pune bypoll election

पुणे : पुण्यात सध्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कसबा निवडणुकीसाठी स्वत: देवेंद्र फडणीवस पुण्यात मुक्काम ठोकून आहेत. तसेच भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी देखील पुण्यात तळ ठोकून आहेत. मात्र, कसब्याचे किंगमेकर गिरीश बापट हे या निवडणुकीपासून दूर राहणार होते. तसे पत्रही त्यांनी पक्ष प्रमुखांना दिले होते. दरम्यान ते नाराज असल्याची देखील चर्चा होती. यामुळे भाजपचे टेंशन वाढल्याने देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भेट घेत त्यांचे मनवळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. नाकाला ऑक्सीजन नळी आणि थरथरत्या हातांनी त्यांनी व्हीलचेअर वरून येत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारात रॅलीत सहभाग घेतला. यामुळे भाजपच्या करकर्त्यांचे मनोबल वाढलेले दिसले.

पुण्यात चिंचवड आणि कसबा पेठेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने अशी लढत आहेत. तर चिंचवड येथे भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे तर अपक्ष बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षातील नेते मंडळी पुण्यात तळ ठोकून आहेत.

मात्र, कसाब मतदार संघात गिरीश बापट यांची तब्बेत ठीक नसल्यामुळे त्यांनी या निवडणुकीपासून दूर राहण्याचे ठरवले होते. मात्र, टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी न दिल्याने, ते नाराज असल्याची चर्चा होती. यामुळेच त्यांनी निवडणुकीपासून दूर राहण्याचे ठरवले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे कसब्यातील पारंपरिक मतदार हा भाजप पासून दुरावला जाण्याची भीती असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भाजपची अनेक बडे नेत्यांची भेट घेत त्यांचे मत परिवर्तन करण्याचे प्रयत्न केले होते. जरी ते प्रचारात सहभागी होणार नसले तरी त्यांचा व्हिडिओ काढून त्या प्रसारित करण्याची भाजपने तयारी केली होती. मात्र, बापट यांची मनधरणी करण्यास भाजप नेत्यांना यश आले.

आज खासदार गिरीश बापट यांनी जिवाची तमा न बाळगता पक्षासाठी पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरले. नाकात नळी, थरथरते हात अन् व्हिलचेअरवर त्यांनी केसरी वाड्यातील पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहिले.

खासदार गिरीश बापटांच्या अध्यक्षतेखाली टिळक कुटुंबीयांच्या केसरी वाड्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुक्ता टिळक यांचे कुटुंबीय देखील या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्यासोबतच भाजपचे उमेदवार हेमंत रासने, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, गणेश बीडकर, शैलेश टिळक, कुणाल टिळक उपस्थित होते. त्यांनी त्यांचा संदेश कागदावर लिहून दिला होता. तो यावेळी वाचण्यात आला. यात त्यांनी लिहिले होते की, तुम्हा सगळ्यांना बऱ्याच दिवसांनी भेटून आनंद वाटला. सगळ्यांना सुरुवातीला धन्यवाद देतो. माझ्या आजारपणामुळे मला सगळ्यांशी बोलणं शक्य होत नाही आहे. सर्वांनी खूप काम करा, उमेदवार नक्की निवडून येईल. तुमच्याशी वेळोवेळी संपर्क करेन असे बापट यांनी संदेश पात्रात लिहिले होते.

IPL_Entry_Point

विभाग