मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chandrapur : कोंबड्यांची झुंज लावणं पडलं महागात; आयोजकांसह १३ जणांना पोलिसांकडून अटक

Chandrapur : कोंबड्यांची झुंज लावणं पडलं महागात; आयोजकांसह १३ जणांना पोलिसांकडून अटक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 10, 2023 09:11 AM IST

cockfighting case in chandrapur : कोंबड्यांची झुंजीचा कार्यक्रम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापेमारी करत तीन लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे.

cockfighting event in chandrapur
cockfighting event in chandrapur (HT)

cockfighting event in chandrapur : मनोरंजनासाठी कोंबड्यांची झुंड लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार विदर्भातील चंद्रपुरातून समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत १३ जणांना अटक केली असून तीन लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. शहरात दिवसाढवळ्या कोंबड्यांची झुंड लावली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह कार्यक्रमात छापेमारी करत कोंबड्यांची झुंज थांबवत आरोपींना अटक केली आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं चंद्रपुरात खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भातील चंद्रपूर शहरात काही ठिकाणी आरोपींकडून कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर सट्टा खेळला जात होता. त्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागातून चांगल्या जातीचे कोंबडे आणली जात होती. याशिवाय झुंजीत जिंकणाऱ्या कोंबड्याचा लिलावही या कार्यक्रमात होत होता. महाराष्ट्रात कोंबड्यांच्या झुंजीवर बंदी असतानाही हा कार्यक्रम होत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कोंबड्यांच्या झुंजी तात्काळ थांबवल्या आहेत. याशिवाय या कार्यक्रमाच्या आयोजकांसह तब्बल १३ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडील तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महाराष्ट्रात कोंबड्यांच्या झुंजीवर बंदी घालण्यात आलेली असली तरी अनेक ठिकाणी कोंबडबाज छुप्या पद्धतीनं कोंबड्यांच्या झंजीचा कार्यक्रम आयोजित करतात. कोंबड्यांच्या झुंजीवर सट्टा लावला जात असल्यामुळं यात आर्थिक व्यवहारही मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळं आता या घटनेनंतर कोंबड्यांची झुंज लावणारी मोठी टोळी सक्रीय तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

IPL_Entry_Point