मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Modi In Mumbai : ‘चार पिढ्यांपासून माझं बोहरा समाजाशी नातं’, पीएम मोदींकडून सैफ अकादमीचं उद्घाटन

Modi In Mumbai : ‘चार पिढ्यांपासून माझं बोहरा समाजाशी नातं’, पीएम मोदींकडून सैफ अकादमीचं उद्घाटन

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 10, 2023 06:41 PM IST

PM Narendra Modi Mumbai Visit : पीएम नरेंद्र मोदी यांनी सैफी अकादमी या शैक्षणिक संस्थेचं उद्घाटन केलं आहे. यावेळी त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून बोहरा समाजाशी नातं असल्याचं सांगितलं आहे.

PM Narendra Modi On Bohra Community In Mumbai
PM Narendra Modi On Bohra Community In Mumbai (HT)

PM Narendra Modi On Bohra Community In Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदे भारत एक्स्प्रेसचं मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल्यानंतर पीएम मोदींनी मुंबईतील बोहरा समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. बोहरा समाजाच्या सैफी अकादमीचं उद्घाटन केल्यानंतर पीएम नरेंद्र मोदींनी आपण बोहरा समाजाचेच सदस्य असल्याचं सांगत गेल्या चार पिढ्यांपासून समाजाशी नातं असल्याचं सांगितलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सैफी अकादमीचं उद्घाटन केल्यानंतर पीएम नरेंद्र मोदी बोलताना म्हणाले की, मला बोहरा समाजाकडून नेहमीच मिळालेलं प्रेम आजही अबाधित आहे. अनेकदा परदेशात जातो त्यावेळेस बोहरा समाजबांधव भेटतात, त्यांच्यामुळंच महात्मा गांधींचं स्मारक झाल्याचं पीएम नरेंद्र मोदी म्हणाले. बोहरा समाजाशी माझं जुनं नातं आहे. गेल्या चार पिढ्यांपासून मी बोहरा समाजासाठी जोडला गेलेलो आहे. बोहरा कुटुंबाचा सदस्य होण्याचं सौभाग्य फार कमी लोकांना मिळतं. मला सैफी अकादमीचं उद्घाटन करण्याची संधी मिळाल्यामुळं फार आनंद झाल्याचं पीएम मोदी म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ आणि दिल्लीतील बोहरा समाजाच्या कार्यक्रमातही यापूर्वी हजेरी लावत लावली होती. त्यानंतर आता मुंबईतही मोदी यांच्या हस्ते बोहरा समाजाच्या सैफी अकादमीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजपनं बोहरा आणि पसमांदा मुस्लिमांपर्यंत पोहचण्याची मोहिम सुरू केली आहे. पीएम मोदींनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच बोहरा समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळं त्यावरून तर्कवितर्क लावले जात आहे.

IPL_Entry_Point