मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Siddhesh Abhange : ठाण्यातील कुख्यात गुंडही अयोध्या दौऱ्यावर; शिंदे-फडणवीस टीकेच्या रडारवर

Siddhesh Abhange : ठाण्यातील कुख्यात गुंडही अयोध्या दौऱ्यावर; शिंदे-फडणवीस टीकेच्या रडारवर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 10, 2023 02:06 PM IST

Ambadas Danve on Siddhesh Abhange Ayodhya Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्यावारीत ठाण्यातील कुख्यात गुंड सिद्धेश अभंगे हा देखील सहभागी असल्यानं शिंदे-फडणवीसांवर टीकेची झोड उठली आहे.

Siddhesh Abhange
Siddhesh Abhange

Ambadas Danve on Siddhesh Abhange Ayodhya Tour : भाजपसोबत राज्यात सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी आपला पहिला अयोध्या दौरा केला. हिंदुत्वाची भूमिका अधोरेखित करण्याच्या दृष्टीनं त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण होता. आपल्या समर्थक आमदार-खासदारांसह शिंदे यांनी शक्तिप्रदर्शनही केलं. मात्र, या दौऱ्यातील एका पाहुण्यावरून आता शिंदे व फडणवीसांना टीकेची झोड उठली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ठाण्यातील एक कुख्यात गुंड मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांसमवेत विमानात बसून अयोध्येवारीला गेल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. सिद्धू उर्फ सिद्धेश अभंगे असं या गुंडाचं नाव आहे. बेकायदा शस्त्र बाळणणे, खंडणी मागणे व खुनाच्या प्रयत्नात अभंगे हा आरोपी आहे. सिद्धेश अभंगे यानं तुरुंगवासही भोगला आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारा भाजप खासदार आता म्हणतो...

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार, खासदार व माजी नगरसेवकांसोबत गॉगल आणि गळ्यात भगवी शाल घालून सिद्धेश अभंगे विमानात बसलेला दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला त्याचा फोटो विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेअर केला आहे व मुख्यमंत्री शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

'काय हा 'फडतूस'पणा आहे? आधी गुजरातला वॉशिंग मशीन लावून गद्दाराना धुतले. आता पवित्र अशा अयोध्येत वॉशिंग मशीन लावून खून, खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगे याला धुवायला नेलेला वाटतं. तेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानातून. आता हे तुम्हाला चालते का, असा प्रश्न दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांना केला आहे.

काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या महिला शिवसैनिक रोशनी शिंदे यांना एकनाथ शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. शाखेच्या ताब्यावरून ठाणे जिल्ह्यात अशा अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं शिंदे-फडणवीस सरकारवर गुंडगिरीचा आरोप केला होता. ठाण्यात महाविकास आघाडीनं मोर्चाही काढला होता. आता खुद्द एक गुंडच मुख्यमंत्र्यांच्या विमानातून अयोध्या दौऱ्यावर गेल्याचे फोटो व्हायरल झाल्यानं विरोधक आक्रमक झाले आहेत.

IPL_Entry_Point