मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune bypoll : पुणे पोटनिवडणुकीत मनसेची भाजपला साथ; राष्ट्रवादी म्हणते, ईडीच्या तालावर नाचणारे…

Pune bypoll : पुणे पोटनिवडणुकीत मनसेची भाजपला साथ; राष्ट्रवादी म्हणते, ईडीच्या तालावर नाचणारे…

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 15, 2023 10:37 AM IST

NCP attacks Raj Thackeray over Pune bypoll : पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. काल मनसेने भाजपला पाठिंबा देताच राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज मनसेच्या भूमिकेवर जहरी टीका केली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हे ट्विट केले आहे.

Fadnavis - Raj
Fadnavis - Raj

पुणे : पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. कसबा येथे कॉँग्रेसचे रविंद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने अशी लढत होणार आहे. तर चिंचवड येथे भाजपच्या अश्विनी जगतात, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कालाटे अशी लढत आहे. त्यात काल काल मनसेने भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेच्या भूमिकेवर टीका करत त्यांच्यावर हल्ला केला आहे. राष्ट्रावादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करत मनसेवर टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्या अशी भूमिका घेतली होती. मात्र, बिनविरोध निवडणूक करण्याचे प्रयत्न अयशस्वी झाली असून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आता दोन्ही मतदार संघात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला पाठिंबा देताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगातप यांनी ट्विट करत मनसेवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे की, "कोथरूडमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देताय...,बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत", अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.

२०१९ च्या विधान सभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉंग्रेसने कोथरुड विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार अॅड. किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात चंद्रकांत पाटील हे भाजपचे उमेवर किशोर शिंदे यांनी कोथरुडमध्ये तब्बल ८० हजार मतं मिळवली होती. त्याचाच संदर्भ देत प्रशांत जगताप यांनी टीका केली आहे. जगताप यांनी बोलघेवडे पोपट असा उल्लेख करत मनसेवर हल्लाबोल केला आहे.

IPL_Entry_Point