मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gram Panchayat Election : बीडमध्ये पुतण्याकडून काकांना धोबीपछाड; संदीप क्षीरसागरांनी मारली बाजी

Gram Panchayat Election : बीडमध्ये पुतण्याकडून काकांना धोबीपछाड; संदीप क्षीरसागरांनी मारली बाजी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 20, 2022 02:06 PM IST

Sandeep Kshirsagar vs Jaidatta Kshirsagar : राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पॅनलनं माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पॅनलचा चार गावात पराभव केला आहे.

Sandeep Kshirsagar vs Jaidatta Kshirsagar In Gram Panchayat Election
Sandeep Kshirsagar vs Jaidatta Kshirsagar In Gram Panchayat Election (HT)

Sandeep Kshirsagar vs Jaidatta Kshirsagar In Gram Panchayat Election : राज्यातील २८ जिल्ह्यातील सात हजारांहून अधिक ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. मराठवाड्यातील अनेक ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून काही ठिकाणी अजून मतमोजणी सुरू आहे. परंतु आता बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पॅनलनं तब्बल चार गावात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पॅनलचा पराभव केला आहे. त्यामुळं आमदार पुतण्यानं बीडमध्ये पुन्हा एकदा काकांना धोबीपछाड दिली आहे. जयदत्त श्रीरसागर यांचं होम पीच मानल्या जाणाऱ्या राजुरी जिल्हा परिषद सर्कलमध्येच राष्ट्रवादीनं विजय मिळवल्यानं त्याची संपूर्ण बीड जिल्ह्यात चर्चा होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बीडमध्ये संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीआधी जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश करत मंत्रीपद मिळवलं होतं. परंतु विधानसभेच्या निवडणुकीत संदीप श्रीरसागर यांनी त्यांचे काका असलेल्या जयदत्त श्रीरसागर यांचा पराभव केला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता ग्रामपंचायचीच्या निकालात झाली आहे. राष्ट्रवादीनं बीडमधील उमरद जहागीर, लिंबारुई, आणि दगडी शहजाणपूर या ग्रामपंचायतीत विजय मिळवला आहे. त्यामुळं गेल्या अनेक दिवसांपासून जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांची सत्ता असलेल्या ग्रामपंयातीत राष्ट्रवादीचा विजय झाल्यानं जयदत्त क्षीरसागर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या जन्मगावात राष्ट्रवादीचा विजय...

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं जन्मगाव असलेल्या नाथरा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या अभय मुंडे यांनी ६४८ मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळं हा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. याशिवाय परळीतील पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे यांच्या पॅनलकडेही राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग