मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar Speech : मविआतील जागावाटपाचा फॉर्म्यूला काय असणार?, अजित पवारांची स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar Speech : मविआतील जागावाटपाचा फॉर्म्यूला काय असणार?, अजित पवारांची स्पष्टच सांगितलं

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 07, 2023 05:57 PM IST

Ajit Pawar Speech : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाल्यामुळं अजित पवारांनी खंत व्यक्त केली आहे.

Ajit Pawar Speech In Pathardi Ahmednagar
Ajit Pawar Speech In Pathardi Ahmednagar (PTI)

Ajit Pawar Speech In Pathardi Ahmednagar : पुण्यातील कसबा पेठ विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केल्यानंतर आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मविआतील कोणता पक्ष किती जागा लढवणार?, याबाबतचा संभ्रम आता खुद्द राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संपवला आहे. अहमदनगरच्या पाथर्डीत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मेळावा घेतला आहे. त्यात त्यांनी मविआतील जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

पाथर्डीतील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की,आगामी विधानसभेच्या निवडणुका मविआ एकत्र लढवणार असून ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची ताकद आहे, तिथं इतर दोन्ही पक्ष उमेदवाराला विजयी करण्यासाठी काम करतील. जागावाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तेच सूत्र आपल्याला पाळावं लागणार आहे. सर्वांनी एकदिलानं काम केल्यास कसब्यासारखाच निकाल लागेल, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

कसब्यात भाजपचा पराभव होऊनही त्यांचे नेते पुढील निवडणुका जोमाने लढण्याची भाषा करत आहेत. परंतु महाविकास आघाडीतील घटकपक्ष म्हणून आम्हीदेखील डबल जोमाने निवडणुका लढणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. आपल्याला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आम्ही मविआचं काम का करायचं?, असं कुणी करू नका, असाही सज्जड दम अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना भरला आहे.

IPL_Entry_Point