मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  RSS On Muslim : मुस्लिमांनी अहंकार सोडावा, श्रेष्ठत्वाचा बडेजाव करू नये; मोहन भागवतांचं वक्तव्य

RSS On Muslim : मुस्लिमांनी अहंकार सोडावा, श्रेष्ठत्वाचा बडेजाव करू नये; मोहन भागवतांचं वक्तव्य

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 11, 2023 09:53 AM IST

Mohan Bhagwat : भारत नेहमीच अखंड राहिलेला आहे. परंतु जेव्हा देशातील हिंदू अखंडतेची भावना विसरला तेव्हा-तेव्हा देशाची फाळणी झाल्याचंही भागवत म्हणाले.

RSS Chief Mohan Bhagwat On Muslims
RSS Chief Mohan Bhagwat On Muslims (HT)

RSS Chief Mohan Bhagwat On Muslims : भारताला हिंदुस्तानच म्हटलं गेलं पाहिजे आणि या देशात मुस्लिमांना घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. परंतु मुसलमानांनी अहंकार सोडून श्रेष्ठत्वाचा बडेजाव करू नये, असं धक्कादायक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या पांचजन्यला दिलेल्या मुलाखतीत भागवतांनी देशातील अनेक घडामोडींवर भाष्य केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पांजजन्यशी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, मुस्लिमांनी भारतावर राज्य केलं, वंश म्हणून त्यांचाच मार्ग योग्य असल्याची भावना मुस्लिमांनी बाळगू नये. हिंदू आणि मुस्लिम वेगवेगळे असून दोन्ही एकत्र राहू शकत नाही, हा विचार मुस्लिमांना सोडावा लागेल. केवळ मुस्लिमांनीच नाही तर कम्युनिस्ट आणि हिंदूंनी या तर्कानं विचार करणं चुकीचं असल्याचं भागवतांनी म्हटलं आहे. केवळ आमचंच सत्य आणि तुमचं खोट असं कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणत नाही. तुम्ही तुमच्या आणि आम्ही आमच्या जागी योग्य असून त्यासाठी भांडण्याची गरज काय आहे?, त्यामुळं सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणं हे हिंदुत्व असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत म्हणालेत.

सध्याच्या काळात जगभरातील हिंदू समाजात एक प्रकारची आक्रमकता दिसून येत आहे. एक हजार वर्ष विदेशी आक्रमकांशी युद्ध करणाऱ्या हिंदू समाजात जागृती निर्माण झाली आहे. त्यामुळं आता आरएसएसही हिंदूंच्या प्रगतीला पाठिंबा देत असल्याचं भागवत म्हणाले. इतिहासाची गणना सुरू झाली तेव्हापासून भारत हा अखंडच राहिलेला आहे. परंतु जेव्हा अखंडतेची भावना हिंदू विसरला तेव्हा भारताची फाळणी झालेली आहे, असंही मोहन भागवत म्हणाले. 

IPL_Entry_Point

विभाग