मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shinde vs Thackeray : उद्धव ठाकरेंचं शिवसेना पक्षप्रमुखपद बेकायदेशीर; शिंदे गटाचा आयोगासमोर दावा

Shinde vs Thackeray : उद्धव ठाकरेंचं शिवसेना पक्षप्रमुखपद बेकायदेशीर; शिंदे गटाचा आयोगासमोर दावा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 11, 2023 08:52 AM IST

Shinde vs Thackeray : चार वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी कुणालाही कल्पना न देता पक्ष संघटनेत बदल करून अनेक पदं तयार केल्याचा आरोप शिंदे गटानं ठाकरे गटावर केला आहे.

Shinde vs Thackeray in election commission
Shinde vs Thackeray in election commission (HT)

Shinde vs Thackeray in election commission : सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपल्यानंतर शिवसेनेवर दावा सांगण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटात निवडणूक आयोगासमोर संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं आहे. काल संध्याकाळी शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर शिवसेनेवर दावा सांगताना महत्त्वपूर्ण युक्तिवाद केले आहेत. त्यात शिंदे गटानं थेट उद्धव ठाकरेंचं शिवसेना पक्षप्रमुखपदच बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं आता यावरून शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

शिंदे गटानं आयोगासमोर काय म्हटलं?

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद करताना म्हटलं की, शिवसेना पक्षाची घटना ही बाळासाहेब ठाकरेंनी तयार केली होती. ते हयात असताना उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष हे पद देण्यात आलेलं होतं. परंतु बाळासाहेबांच्या निधनानंतर घटनाबाह्य पद्धतीने शिवसेना पक्षप्रमुखपद निर्माण करण्यात आलं. याशिवाय २०१८ साली पक्षातील कोणत्याही नेत्याला विश्वासात न घेता उद्धव ठाकरेंनी पक्षसंघटनेत अनेक बदल केले. त्यामुळं ठाकरेंचं पक्षप्रमुख हे पदच बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

अनिल देसाई यांनी काय म्हटलं आहे?

शिंदे गटाकडून आमचीच बाजू कशी योग्य आहे, हे सांगण्यात आलं आहे. परंतु हा सर्व लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रकार आहे. निवडणूक आयोग अथवा सुप्रीम कोर्टानं आमची सर्व बाजू ऐकून घ्यावी. कारण पक्षानं तिकीट दिल्यानंतरच शिंदे गटाचे नेते आमदार आणि खासदार झालेले आहेत. त्यामुळं शिवसेनेचं चिन्हा ठाकरेंनाच मिळणार असल्याचा दावा अनिल देसाईंनी केला आहे.

पुढची सुनावणी कधी होणार?

ठाकरे गटानं युक्तिवाद करताना सुप्रीम कोर्टात या प्रकरणांचा निकाल लागल्याशिवाय निर्णय घेता येणार नसल्याचं म्हटलं आहे. तर निकालामुळं कुणीही अपात्र ठरणार नसल्यामुळं आज जरी निर्णय घेतला तरी काही अडचण नसल्याचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी येत्या काही दिवसांत पुन्हा सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

IPL_Entry_Point