मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “यापुढे खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्यास..” अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना थेट इशारा

“यापुढे खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्यास..” अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना थेट इशारा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 10, 2023 09:01 PM IST

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. यापुढे राजकीय विरोधक म्हणून कुणाला खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला.

अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना थेट इशारा
अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना थेट इशारा

विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या गुन्हे दाखल करण्याच्या प्रकरणावर अजित पवारांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. केवळ राजकीय विरोधक आहे, म्हणून एखाद्या नेत्याला खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते सहन करणार नाही,असा इशारा अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणावरून पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

ट्रेंडिंग न्यूज

अजित पवार म्हणाले की,जरएकाद्याने चूकीचे काम केले असेल मग तो कुणीही का असेना.. मी जरी असलो तरी कारवाई व्हावी. दोषीवर कारवाई करण्याबाबत कुणाचंही दुमत नाही. मात्र जाणूनबुजूनकोणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्नकेल्यास हे खपवून घेतले जाणार नाही. कुणाला तरीतक्रारदार म्हणून उभं करणं, असं झालं तर हे खपवून घेतले जाणार नाही.

चुकीच्या कामाबाबत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु उगीचच विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी जर कोणाला तरी अडकवण्याचा प्रयत्न केल्यास हे सहन केले जाणार नाही. याआधी अशाच प्रकारे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले. त्यामुळे त्यांनी उद्विग्न होऊन आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी केली होती. मात्र पवार साहेबांनी त्यांना समजावले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या