मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gautam Adani Raj Thackeray meeting : ‘शिवतीर्था’वर जाऊन गौतम अदाणींनी घेतली राज ठाकरेंची भेट; चर्चांना उधाण

Gautam Adani Raj Thackeray meeting : ‘शिवतीर्था’वर जाऊन गौतम अदाणींनी घेतली राज ठाकरेंची भेट; चर्चांना उधाण

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 11, 2023 08:39 AM IST

Adani Group Chief Gautam Adani Meet Mns Chief Raj Thackeray At Shivtirth Mumbai : अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोघांची भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Gautam Adani-Raj Thackeray meeting
Gautam Adani-Raj Thackeray meeting

मुंबई : अदाणी समुहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ येथे जात भेट घेतली. मंगळवारी झालेल्या दोघांच्या भेतीमुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. तसेच अनेक चर्चाही त्यांच्या भेतीमुळे सुरू झाल्या आहेत. एकीकडे राज्यातून मोठे प्रकल्प बाहेर जात आहे. त्यात राज ठाकरे आणि गौतम अदाणी यांची भेट झाल्याने नेमकी त्यांनी कोणत्या विषयावर चर्चा केली, त्यांच्या भेटीचे नेमके कारण काय असे अनेक प्रश्न गुलदस्त्यात आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यातून अनेक मोठे प्रकल्प हे बाहेर जात आहेत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्यात राज ठाकरे यांनी देखील एक दोन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने काही फरक पडत नाही असे व्यक्तव्य केले होते. या घटना ताज्या असतांना अदाणी समुहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, मुंबईतील काही प्रकल्पा संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट झाली असावी असा कयास लावला जात आहे. सध्या धारावी डेव्हलपमेंटचा मुंबईमधील मोठा प्रकल्प हा अदाणी ग्रुपला मिळाला आहे. त्यामुळे या प्रकल्पात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी अदाणी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याची शक्यता आहे.

अदाणी यांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील बारामती येथे जात भेट घेतली होती. यावेळी रोहित पवार यांनी त्याचे सारथ्य केल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर अदाणी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. दरम्यान, त्यांच्यात नेमकी कुठल्या विषयावर चर्चा झाली या बाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या