मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई हादरली.. मरीन ड्राईव्हजवळच्या वसतीगृहात १९ वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या, संशयिताची रेल्वेखाली आत्महत्या!

मुंबई हादरली.. मरीन ड्राईव्हजवळच्या वसतीगृहात १९ वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या, संशयिताची रेल्वेखाली आत्महत्या!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 07, 2023 12:01 AM IST

Marine Line Hostel Girl Murder : मुंबईत चर्चगेट परिसरातीलएका वसतीगृहातील १९ वर्षीय मुलीवरअत्याचार करूनतिचीहत्या करण्यात आल्याचीखळबळजनकघटनासमोर आली आहे.

Mumbai crime
Mumbai crime

मुंबईत महिलांसाठी असुरक्षित बनत चालल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. मुंबईत चर्चगेट परिसरातील एका वसतीगृहातील १९ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मरीन ड्राईव्ह जवळ असलेल्या वसतीगृहामध्ये मुलीचा मृतदेह आढळला. या मुलीवर बलात्कार करून तिचीहत्या करण्यातआल्याचे बोलले जात असून याचा संशय वसतीगृहाच्या वॉचमनवर होता. मात्र सकाळपासून बेपत्ता असलेल्या वॉचमनचा मृतदेह रेल्वे ट्रकवर आढळल्याने प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून पोलिस संपूर्ण घटनाक्रम तपासत आहेत. ओमप्रकाश कनौजिया (वय ५३) असं संशयित वॉचमनचं नावअसल्याचं सांगण्यात येतंय. मृत मुलीच्या गळ्याभोवती तिचा दुपट्टा गुंडाळलेला होता.

मरीन ड्राईव्हजवळील असलेल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. पोलिसांना माहिती मिळाली होती की सावित्रीबाई फुले हॉस्टेलमध्ये एक मुलगी मृतावस्थेत आढळली असून तिच्या खोलीचा दरवाजा बाहेरून लॉक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची समोर आले आहे. वसतीगृहाच्या सुरक्षारक्षकाने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.

संशयित सुरक्षारक्षक बेपत्ता झाला होता. या सुरक्षा रक्षकाने तरुणीच्या हत्येनंतर ट्रेन खाली उडी मारून आत्महत्या केली आहे.

मरीन ड्राईव्ह पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. सायंकाळी वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर मृतदेह आढळून आला. सूत्रांनी सांगितले की या मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात वसतिगृहाच्या वॉचमनवर संशय होता आणि तो सकाळपासून बेपत्ता होता. आता त्या वॉचमनचा मृतदेह आढळला आहे. या वॉचमनचा मृतदेह हा चर्नी रोड पोलीस स्टेशनच्या जवळ असलेल्या रेल्वे ट्रॅकवर मिळाला.

IPL_Entry_Point