Mumbai Building Collapses News: मुंबईच्या फोर्ट परिसरात शुक्रवारी दुपारी इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली. या घटनेत तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. एका जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. इतर दोन जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला.
नागरी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाजवळील एमजी रोडवर असलेल्या जमिनीच्या टेरेस आणि वरच्या दोन मजल्यांच्या भाग शुक्रवारी दुपारी १२.५२ वाजताच्या सुमारास कोसळला. मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस कर्मचारी, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि स्थानिक बीएमसी वॉर्ड कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसराची तात्पुरती नाकाबंदी करण्यात आली आणि जखमींना बॉम्बे रुग्णालयात नेण्यात आले.
संजय सिंह (वय, ४८) असे जखमी झालेल्या एका व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले. तर, दोन जखमींनी रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गुरुवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामुळे अनेक तास वाहतूक विस्कळीत झाली. रात्री उशिरा झालेल्या या अपघातामुळे सकाळच्या वेळेतही वर्दळीच्या महामार्गावर अनेक तास वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, मालवाहू ट्रक आणि ट्रेलरसह अवजड वाहने सहसा पहाटेच्या वेळेत शहरांतून प्रवास करतात. ज्यामुळे सकाळच्या वेळेस वाहतुकीची समस्या निर्माण होते.
सांगली जिल्ह्यात क्रुझर आणि जीप यांच्यात अपघात झाला. या अपघातात ७ जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे. तर, १० ते १२ जण प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे या अपघातातील मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.