मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Akola Crime : नात्याला काळिमा! अकोल्यात आजोबाकडून १७ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार, पीडिता ९ महिन्यांची गर्भवती

Akola Crime : नात्याला काळिमा! अकोल्यात आजोबाकडून १७ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार, पीडिता ९ महिन्यांची गर्भवती

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 18, 2024 05:02 PM IST

Akola Crime News : अकोला जिल्ह्यात ५० वर्षीय आजोबाने आपल्या अल्पवयीन नातीवर गेल्या दीड वर्षापासून अत्याचार केला. यात १७ वर्षीय पीडिता गर्भवती राहिली आहे.

अकोल्यात आजोबाकडून १७ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार (संग्रहित छायाचित्र)
अकोल्यात आजोबाकडून १७ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार (संग्रहित छायाचित्र)

नात व आजोबाच्या आपुलकीच्या व पवित्र नात्याला काळिमा फासल्याची घटना अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. अकोल्यात ५० वर्षीय नराधमाने आपल्या १७ वर्षाच्या नातीलाच वासनेची शिकार बनवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. आरोपी पीडितेचा चुलत आजोबा आहे. पीडिता ९ महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

ट्रेंडिंग न्यूज

आरोपीकडून नात्याने नात लागत असलेल्या मुलीवर गेल्या दीड वर्षापासून अत्याचार केला जात होता. विशेष म्हणजे शेजारच्या एका महिलेने पीडितेला अन्य एका तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले. या लैंगिक शोषणातून पीडिता गर्भवती राहिली. सध्या मुलीचे वय १७ वर्षे असून ती ९ महिन्यांची गरोदर आहे. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असताना तिच्या ५० वर्षीय आजोबाने नग्न फोटो काढले. त्यानंतर हे फोटो दाखवून तिला ब्लॅकमेल करू लागला. आरोपीने तिला कारमध्ये नेत फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने पीडित मुलीसोबत बळजबरीने अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबरोबरच अन्य एका तरुणानेही मुलीवर बलात्कार केल्यामुळे पीडिता गर्भवती राहिली.

पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेनेही तिला ब्लॅकमेल करत २३ वर्षीय तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. मुलीवर अकोला व मलकापूर तसेच अन्य ठिकाणी नेऊन वारंवार बलात्कार करण्यात आला. गेल्या दीड वर्षापासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. या घटनेनंतर कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

आरोपी आजोबा आणि शेजारच्या महिलेकडून तिच्यावर अत्याचार करण्यासाठी दबाव होता. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी आरोपींवर बाल संरक्षण कायदा अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी चुलत आजोबा व २३ वर्षीय तरुण फरार हे. त्याचा तपास सुरु आहे. ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरु केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या महिलेकडून पीडित मुलीला बदनामी भाती दाखवून अत्याचार केले जात होते. दोन महिन्यानंतर पीडित मुलीची मोठी बहीण घरी आली,त्यानंतर तिने हा प्रकार बहिणीला सांगितला. बदनामीच्या भीतीमुळे आई-वडिलांनी मुलीला बहिणीसोबत बाहेरगावी पाठवून दिले होते. मुलगी गरोदर राहिल्याने कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार करू नये, म्हणून त्यांना जीवे मारण्याची व बदनामीची धमकी दिली जात होती.

IPL_Entry_Point

विभाग