मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज! 'या' जिल्ह्यांना यलो व ऑरेंज अलर्ट, वाचा

Maharashtra Weather Update : राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज! 'या' जिल्ह्यांना यलो व ऑरेंज अलर्ट, वाचा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 23, 2024 06:40 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात आज अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात ऑरेंज तर काही भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज! 'या' जिल्ह्यांना यलो व ऑरेंज अलर्ट, वाचा
राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज! 'या' जिल्ह्यांना यलो व ऑरेंज अलर्ट, वाचा

Maharashtra Weather Update : राज्यात आज बहुतांश जिल्ह्यात वादळी वारा, मेघ गर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खास करून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात हा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण जरी असले तरी मोठ्या प्रमाणात तापमान देखील वाढले आहे. मुंबईत आणि ठाण्यात उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. तर विदर्भात काही जिल्ह्यात तापमान हे सोमवारी देखील ४० डिग्री सेल्सिअसच्या पुढे राहिले.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

Uddhav Thackeray : 'दिला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा...' उध्दव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची चक्रीय स्थिती म्हणजे सायकल आणि सर्कुलेशन हे मराठवाडा व लगतच्या विदर्भावर आहे. यामुले वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा ही छत्तीसगड ते दक्षिण केरळ पर्यंत गेली आहे. ही द्रोणिका रेषा मराठवाडा व लगतच्या विदर्भावर असलेल्या चक्रीय स्थितीमधून जात असल्याने आज संपूर्ण राज्यात आज ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस कोकण वगळता उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Baramati Loksabha : बारामतीमध्ये दोन उमेदवार ‘तुतारी’ घेऊन लढणार, सुप्रिया सुळेंचा आक्षेप

कोकणात उष्ण व दमट वातावरण

कोकणात पुढील पाच दिवस वातावरण उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग मध्ये २५ एप्रिलला वातावरण उष्ण व दमट राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि विजांचा कडकडात या सह वादळी वारा वाहण्याची शक्यता आहे. तर आज परभणी व हिंगोलीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

Baramati Loksabha : बारामतीमध्ये दोन उमेदवार ‘तुतारी’ घेऊन लढणार, सुप्रिया सुळेंचा आक्षेप

विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट

विदर्भात आज अमरावती नागपूर वर्धा व यवतमाळ येथे मेघगर्जना व विजांचा कडकडाट तसेच वादळी वाऱ्यासह गारा व पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर इतका आहे. त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उद्या नागपूर, वर्धा यवतमाळ येथे मेघ गर्जना आणि विजांचा कडकडाट तसेच वादळी वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघ गर्जना, वादळी वारे, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तेथे सुद्धा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यात असे असेल तापमान

पुणे व परिसरात आज पासून २५ एप्रिल पर्यंत आकाश मुख्यता निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ जाण्याची शक्यता आहे. २६ व २७ एप्रिलला आकाश अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point

विभाग