मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : राज ठाकरे करणार नवनीत राणांचा प्रचार? पोस्टरवरील फोटो पाहून चर्चांना उधाण

Raj Thackeray : राज ठाकरे करणार नवनीत राणांचा प्रचार? पोस्टरवरील फोटो पाहून चर्चांना उधाण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 29, 2024 07:42 AM IST

Raj Thackeray Navneet Rana : नवनीत राणा यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर महायुतीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. यामुळे राज ठाकरेही नवनीत राणाच्या प्रचारासाठी येणार का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

महायुतीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांचाही फोटो
महायुतीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांचाही फोटो

अमरावती भाजपचे नेते, प्रहार संघटनेचे बच्चू कडू तसेच शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या विरोधाची पर्वा न करताभाजपनं नवनीत राणा (Navneet Rana)यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना अमरावती मतदारसंघातूनलोकसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर त्यांनी बुधवारी रात्रीच स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हनुमानाची मूर्ती देऊन राणांचं भाजपमध्ये स्वागत केली. उद्धव ठाकरेंच्या विरोधात मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा आंदोलन करणाऱ्या राणांना भाजपकडून त्या आंदोलनाचं बक्षीस दिल्याचं बोललं जात आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवनीत राणा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर प्रोफाईलमध्ये मोदी का परिवार शब्द जोडले आहेत. त्याचबरोबर शिवजयंतीच्या शुभेच्या देणारे पोस्टर शेअर केले आहे. त्या पोस्टरवर भाजप नेत्यांसह महायुतीतील नेत्यांचे फोटो आहेत. यातील एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टरवर महायुतीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे (Raj Thackeray)यांचाही फोटो लावण्यात आला आहे. यामुळे राज ठाकरेही नवनीत राणाच्या प्रचारासाठी येणार का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. राज ठाकरे महायुतीत सामील झाल्यानंतर ते महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्यभर सभा घेणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

नवनीत राणा यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह एकूण १५ नेत्यांचे फोटो आहेत. यात राज ठाकरेंचाही फोटो आहे. राणा यांनी राज ठाकरेंचा पोस्टरवर फोटो लावल्याने राज ठाकरे महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान स्थानिक पातळीवर राणांना विरोध वाढताना दिसत आहे. बच्चू कडू व अडसूळ यांची समजूत काढण्यात महायुतीच्या नेत्यांना अजूनतरी यश आलेले नाही. अडसुळांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनी लोकसभेचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची तयारीही सुरू केल्याचं बोललं जातंय. तसं झाल्यास अमरावतीची रणसंग्राम तिरंगी होण्याची शक्यता आहे.

 

 

IPL_Entry_Point