मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Live News Updates 28 February 2023

Live News

Live News Updates 28 February 2023 : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सुप्रीम कोर्टात धाव

Manish Sisodia: कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं अटक केलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Tue, 28 Feb 202305:33 AM IST

Manish Sisodia : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं अटक केलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयानं त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. या निर्णयास त्यांनी आव्हान दिलं असून त्यावर आज दुपारी साडेतीन वाजता सुनावणी होणार आहे. सिसोदिया यांनी सीबीआयच्या तपासावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Tue, 28 Feb 202303:50 AM IST

Opening bell : सेन्सेक्स निफ्टीची सुरुवात चांगली, लक्ष जीडीपीच्या आकडेवारीवर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज सेन्सेक्स निफ्टीची सुरुवात चांगली झाली. सेन्सेक्समध्ये ५९,३३९.४० अंश पातळीवर खुला झाला. त्यात अंदाजे ६० अंशांची वाढ झाली. तर निफ्टी १७३९० अंश पातळीवर खुला झाला. आज शेअऱ बाजाराचे लक्ष बजेटनंतर जाहीर होणाऱ्या जीडीपींच्या आकडेवारींवर अधिक असणार आहे.

Tue, 28 Feb 202301:14 AM IST

Nawab Malik : नवाब मलिक यांच्या जामिनावर आज हायकोर्टात सुनावणी

नवाब मलिक यांच्या जामिनावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. वैद्यकीय कारणास्तव मलिकांच्या जामिनावर तातडीनं सुनावणी घेणं हायकोर्टानं मान्य केले आहे.

Tue, 28 Feb 202301:13 AM IST

mumbai news : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे उद्यापासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन

सरकारने संपाची दखल न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे उद्यापासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने गेली साडेपाच वर्षे तर केंद्र शासनाने गेली साडेचार वर्षे मानधनात कोणतीही वाढ दिलेली नाही.

Tue, 28 Feb 202301:13 AM IST

Mumbai : सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेचे आझाद मैदानावर आत्मक्लेश आंदोलन

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आजपासून आमदार गोपाचंद पडळकर यांची सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेचे आझाद मैदानावर आत्मक्लेश आंदोलन करणार आहे.

Tue, 28 Feb 202301:12 AM IST

maharashtra assembly session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विविध मुद्यांवरून दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Tue, 28 Feb 202301:10 AM IST

Maharashtra Politics : सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Maharashtra Politics : महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आज ठाकरे गटाकडून उर्वरित युक्तिवाद होणार असून त्यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. आजपासून पुढचे सलग तीन दिवस खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे.