मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rahul Gandhi : राहुल गांधींसोबत पायी चालणार रोहित पवार; आदित्य ठाकरेही पदयात्रेत होणार सहभागी?

Rahul Gandhi : राहुल गांधींसोबत पायी चालणार रोहित पवार; आदित्य ठाकरेही पदयात्रेत होणार सहभागी?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 26, 2022 08:51 AM IST

Bharat Jodo Yatra : येत्या नऊ नोव्हेंबरला कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेतेही दाखल होणार असल्याचं बोललं जात आहे.

Bharat Jodo Yatra In Maharashtra
Bharat Jodo Yatra In Maharashtra (HT)

Bharat Jodo Yatra In Maharashtra : कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा येत्या नऊ नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणामार्गे भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होईल. या यात्रेच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच आता आमदार रोहित पवार आणि आदित्य ठाकरे हे राहुल गांधींसोबत पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत असलेल्या महाविकास आघाडीला बळ देण्यासाठी तिन्ही पक्ष भारत जोडो यात्रेत एकत्र येणार असल्याचं चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर शिवसेनेकडून मोठे नेते या पदयात्रेत सहभागी होणार असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर आता रोहित पवार आणि आदित्य ठाकरे हे भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत चालणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या नऊ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील देगलूरमध्ये ही यात्रा दाखल होणार आहे. नांदेड, बुलढाणा, वाशिम, जळगांव आणि अकोला या जिल्ह्यांतून ही यात्रा मध्यप्रदेशमध्ये दाखल होईल.

भारत जोडो यात्रेत कोणते नेते सहभागी होण्याची शक्यता..

राहुल गांधींच्या नेत्तृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो यात्रा जेव्हा महाराष्ट्रात येईल, तेव्हा राहुल गांधींच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अनेक आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

IPL_Entry_Point