मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rishi Sunak : ब्रिटनची सुत्रे स्वीकारताच ऋषी सुनक अ‍ॅक्शन मोडवर.. अनेक मंत्र्यांना केले बर्खास्त

Rishi Sunak : ब्रिटनची सुत्रे स्वीकारताच ऋषी सुनक अ‍ॅक्शन मोडवर.. अनेक मंत्र्यांना केले बर्खास्त

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 25, 2022 09:24 PM IST

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सुत्रे स्वीकारताच ऋषी सुनक यांनी आधीच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांना बर्खास्त केले आहे.

 ब्रिटनची सुत्रे स्वीकारताच ऋषी सुनक अ‍ॅक्शन मोडवर..
 ब्रिटनची सुत्रे स्वीकारताच ऋषी सुनक अ‍ॅक्शन मोडवर..

ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची सुत्रे स्वीकारताच ऋषि सुनक यांनी अनेक मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान जेरेमी हंट ब्रिटनच्या अर्थमंत्रीपदावर कायम राहतील. मंत्र्यांना बर्खास्त करण्यापूर्वी सुनक यांनी याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले होते की, त्यांना आधीच्या लोकांनी केलेल्या चुका सुधारण्यासाठी निवडण्यात आले आहे. सुनक यांनी किंग चार्ल्स द्वितीय यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर तासाभरात आपले काम सुरू केले आहे.

सुनक यांनी नव्या मंत्रिमंडळाची घोषणा करण्यापूर्वी माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. आतापर्यंत तीन मंत्र्यांना पद सोडण्यास सांगण्यात आले आहे. सुत्रांनी सांगितले की, यामध्ये व्यापार सचिव जेकब रीस-मोग, न्याय सचिव ब्रँडन लुईस आणि विकास मंत्री विक्की फोर्ड सामील आहेत. मात्र जेरेमी हंट अर्थमंत्रीपदी कायम राहतील.

ब्रिटिश मीडिया रिपोर्टनुसार, ऋषि सुनक आपली नवीन टीम बनवण्यापूर्वी आधीच्या कॅबिनेटमधील लोकांना बाहेर काढत आहेत. यामुळे जेकब रीस-मोग यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. द टेलीग्राफ च्या रिपोर्टनुसार रीस-मोग यांना आधीच माहिती होते की, त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.

लिझ ट्रस मंत्रिमंडळात काम करणाऱ्या कमीत कमी १० वरिष्ठ खासदार आज दुपारपर्यंत सरकारमधून बाहेर पडले होते.रीस-मोग यांच्याबरोबरच राजीनामा देणाऱ्यामध्ये ब्रँडन लुईस, वेंडी मॉर्टन, किट माल्थ हाउस आणि सायमन क्लार्क सामिल आहेत. मात्र त्यांनी म्हटले की, पीएम सुनक यांना आपला पाठिंबा कायम ठेवतील.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या