मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Cabinet Expansion: अधिवेशनापूर्वीच होणार मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार; महामंडळ वाटपासाठीही समिती गठित

Cabinet Expansion: अधिवेशनापूर्वीच होणार मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार; महामंडळ वाटपासाठीही समिती गठित

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 26, 2022 08:21 AM IST

Cabinet Expansion : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारचा एकच कॅबिनेट विस्तार झालेला आहे.परंतु आता हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Maharashtra Chief Minister Eknath Shinde and Dy Chief Minister Devendra Fadnavis
Maharashtra Chief Minister Eknath Shinde and Dy Chief Minister Devendra Fadnavis (PTI)

Cabinet Expansion Maharashtra : शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार हा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल गडचिरोली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्तारात सर्वांचा विचार केला जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असल्यानं त्याकडे शिंदे गट आणि भाजपच्या अनेक आमदारांचं लक्ष लागलेलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार केला होता, त्यावेळी भाजपच्या नऊ आणि शिंदे गटाच्या नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. परंतु आता मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी तीन आमदारांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या विस्तारात १८ मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती.

महामंडळ वाटपासाठी सहा जणांची समिती स्थापन..

मंत्रिमंडळाचा विस्तार करताना राज्यातील महामंडळांच्या वाटपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा जणांची समिती स्थापन केली आहे. त्यामुळं कोणतं महामंडळ कोणत्या पक्षाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील आमदारांची नाराजी समोर आली होती. त्यामुळं आता मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात कोणत्या आमदारांचा नंबर लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोणती नावं मंत्रिपदासाठी चर्चेत?

शिंदे गटाकडून संजय शिरसाट, राजेश क्षिरसागर, शहाजीबापू पाटील आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू तर भाजपकडून माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, संभाजीराव पाटील निलंगेकर, प्रविण दरेकर या नावांची चर्चा सुरू आहे.

IPL_Entry_Point