मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पत्रकार हा पक्षपातीच असला पाहिजे; विजय चोरमारे यांची भूमिका

पत्रकार हा पक्षपातीच असला पाहिजे; विजय चोरमारे यांची भूमिका

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 08, 2023 01:31 PM IST

Vijay Chormare : ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या 'संभ्रमित काळाच्या नोंदी' या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच मुंबईत झालं.

Vijay Chormare
Vijay Chormare

Vijay Chormare : 'निष्पक्ष पत्रकारिता ही संकल्पनाच भोंगळ आहे. निष्पक्ष असं काही नसतं. पत्रकार हा पक्षपातीच असला पाहिजे. त्यानं भूमिका घेऊनच लिहिलं पाहिजे,' असं स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी केलं.

ट्रेंडिंग न्यूज

चोरमारे यांनी लिहिलेल्या 'संभ्रमित काळाच्या नोंदी' (Sambhramit Kalachya Nondi) या पुस्तकाचं प्रकाशन मंगळवारी मुंबईतील एका कार्यक्रमात झालं. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, निखिल वागळे हे देखील यावेळी उपस्थित होते.

'संभ्रमित काळाच्या नोंदी' हे पुस्तक निद्रानाशाच्या पातळीवरचं पुस्तक आहे. एखादी गोष्टी केल्याशिवाय माणसाला शांत झोप लागत नाही. या पुस्तकातील लिखाण हे अशाच अस्वस्थतेतून आलेलं आहे. जे वाटतं ते परखडपणे फेसबुकवर लिहून दुसऱ्या दिवशी परिणामांची तयारी ठेवायची असं ठरवून हे मी लिहिलं होतं. रंगनाथ पठारे आणि निखिल वागळे यांच्या आग्रहामुळं हे लिखाण पुस्तकरूपात आलं आहे, असं मनोगत चोरमारे यांनी यावेळी व्यक्त केलं.

प्रसारमाध्यमांच्या बदलावरही त्यांनी यावेळी भाष्य केलं. 'प्रसारमाध्यमं ही गेल्या काही काळात प्रचारमाध्यमं झाली आहेत हे स्पष्ट दिसतंच आहे. मात्र, पत्रकार हा निष्पक्षपाती असला पाहिजे ही भूमिका मला मान्य नाही. लोकशाहीच्या, संविधानिक मूल्यांच्या व वंचितांच्या बाजूनं भूमिका घेऊन त्यानं लिहिलं पाहिजे. या अर्थानं तो पक्षपाती असला पाहिजे असं मला वाटतं. त्याच भूमिकेतून हे लिखाण मी केलं आहे,' असं चोरमारे म्हणाले.

'न्यायव्यवस्थेच्या संदर्भातही मी पुस्तकात परखड मतं मांडली आहेत. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या वर्गातच कायदा आणि राज्यघटना शिकलेलो असल्यामुळं न्यायालयाबाबत मी अत्यंत जबाबदारीनं लिखाण केलं आहे. कुठल्या गोष्टीचा पंचनामा करायचा आणि कुठं मर्यादा राखायची याचं भान ठेवून लिहिलं आहे,' असं चोरमारे यांनी यावेळी सांगितलं.

IPL_Entry_Point

विभाग