मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nitesh Rane : दमदाट्या करून ग्रामपंचायत जिंकता येत नाही, शिंदे गटाकडून नितेश राणेंना कानपिचक्या

Nitesh Rane : दमदाट्या करून ग्रामपंचायत जिंकता येत नाही, शिंदे गटाकडून नितेश राणेंना कानपिचक्या

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 13, 2022 07:43 AM IST

Nitesh Rane Statement : माझ्या विचारांचा माणूस ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आला नाही तर कोणतीही मदत करणार नसल्याचं वक्तव्य आमदार नितेश राणेंनी केलं होतं.

Sanjay Shirsat On Nitesh Rane
Sanjay Shirsat On Nitesh Rane (HT)

Sanjay Shirsat On Nitesh Rane : आपल्या विचारांना माणूस निवडून दिला नाही तर गावात विकासकामांसाठी कोणतीही मदत न करण्याचं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणेंनी एका प्रचारसभेत केलं होतं. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता शिंदे गटानंही आमदार राणे यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. दमदाट्या करून ग्रामपंचायत जिंकता येत नसतात, त्यासाठी लोकांना आपलंसं करावं लागतं, अशा शब्दांत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी नितेश राणेंना सुनावलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत लोकांना धमक्या देणं योग्य नाही. ग्रामपंचायतीत स्थानिक राजकारण असतं. तिथं धमकी किंवा दादागिरी करणं योग्य नाही. गावातील लोकांना जिंकून आणि त्यांना आपलंसं करून निवडणूक लढवली तर नक्कीच विजय होतो. त्यामुळं नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्य योग्य नसून पूर्णत: चुकीचं आहे, असं म्हणत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी नितेश राणेंना कानपिचक्या दिल्या आहेत.

आमदार नितेश राणे हे आता मोठे नेते होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांनी अशी छोटी वक्तव्य करू नयेत. इतरांना वाटतं की तुम्ही धमक्याच देत आहात. तसं चित्र आपल्याबद्दल होता कामा नये. त्यामुळं दमदाट्या करून ग्रामपंचायत जिंकता येत नसल्याचं सांगत शिरसाट यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.

महिला सुरक्षेसाठी असलेल्या गाड्या परत द्यायला हव्या- शिरसाट

निर्भया फंडातून खरेदी केलेल्या गाड्या आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरण्याता आल्या असतील तर ते थांबलं पाहिजे. आम्ही त्या गाड्या द्या, असं म्हणत नाही. त्या गाड्या महिलांच्या सुरक्षेसाठीच वापरात यायला हव्यात, असंही संजय शिरसाट म्हणाले.

IPL_Entry_Point