मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Third Mumbai news : अटल सेतूच्या आजूबाजूच्या १२४ गावांमध्ये वसणार ‘तिसरी मुंबई’; अशी आहे रचना

Third Mumbai news : अटल सेतूच्या आजूबाजूच्या १२४ गावांमध्ये वसणार ‘तिसरी मुंबई’; अशी आहे रचना

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Mar 05, 2024 03:12 PM IST

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतूच्या आजूबाजूच्या गावांमध्ये 'तिसरी मुंबई' विकसित करण्यासाठी राज्याच्या नगर विकास विभागाने अधिसूचना काढली आहे.

Government of Maharashtra issued notifications for the development of Third Mumbai
Government of Maharashtra issued notifications for the development of Third Mumbai

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) अर्थात अटल सेतूच्या आसपास 'तिसरी मुंबई' विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंबंधी राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने नुकत्याच दोन अधिसूचना काढल्या आहेत. नगरविकास खात्याने काढलेल्या पहिल्या अधिसूचनेनुसार अटल सेतुच्या आजूबाजूची गावे मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अंतर्गत असणाऱ्या ‘न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी’ला (New Town Development Authority - NTDA) विकसित करण्यासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहे. सुमारे ३२३.४४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात वसलेल्या १२४ गावांच्या विकासासाठी एनटीडीएला नियुक्ती करण्याची विनंती एमएमआरडीएने २८ ऑगस्ट २०२३ रोजी राज्य सरकारला केली होती. त्यानुसार ही अधिसूचना काढण्यात आलेली आहे. यामध्ये नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रातील ८० गावे, खोपटा न्यू टाऊन अधिसूचित क्षेत्रातील ३३ गावे, मुंबई मेट्रोपोलिटन रिजनल प्लॅन मधील दोन गावे आणि रायगड प्रादेशिक आराखड्यातील नऊ गावांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

खोपटा व पेणचा बराचसा भाग पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कोस्टल झोन रेग्युलेशनअंतर्गत येत असल्याने जमिनीच्या विकास क्षमतेवर मर्यादा येतात. त्यामुळे नाव हटविल्यामुळे सिडकोला कोणतीही अडचण नसल्याचे सिडकोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सिडको अंतर्गत येणाऱ्या ‘नैना’ (Navi Mumbai Airport Influence Notified Area -  NAINA) अंतर्गत नवीन शहर विकसित करण्यासाठी बऱ्याच काळापासून प्रयत्नशील आहोत. परंतु आता एमएमआरडीएच्या नेतृत्वाखालील एनटीडीएद्वारे अधिक वेगाने नव्या शहराचा विकास होईल असं सरकारला वाटतं, असं या अधिकाऱ्याने सांगितलं.

सरकारने काढलेल्या दुसऱ्या अधिसूचनेत नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रातील ८० गावे आणि खोपटा न्यू टाऊन अधिसूचित क्षेत्रातील ३३ गावांच्या विकासासाठी ‘विशेष प्राधिकरण’ म्हणून शहर व औद्योगिक विकास महामंडळाची (सिडको) सरकारने केलेली नियुक्ती अधिसूचनेद्वारे मागे घेण्यात आली आहे. दुसऱ्या अधिसूचनेत सिडकोचे नाव हटवून हटवून एमएमआरडीएच्या नेतृत्वाखालील एनटीडीएची (New Town Development Authority - NTDA) तिसऱ्या मुंबईचे नियोजक प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्याबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

शिवडी ते चिर्ले जोडणाऱ्या एमटीएचएलचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले, मात्र वाहनचालकांचा प्रतिसाद अत्यल्प आहे. याचा या प्रदेशाच्या आर्थिक विकास ावर आणि वाढीवर मोठा सकारात्मक परिणाम होईल आणि एमटीएचएल प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होईल अशी अपेक्षा आहे.

IPL_Entry_Point

विभाग