मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Metro : मुंबई मेट्रोचं तिकीट आता व्हॉट्सअ‍ॅपवर; 'या' नंबरवर करावा लागणार मेसेज

Mumbai Metro : मुंबई मेट्रोचं तिकीट आता व्हॉट्सअ‍ॅपवर; 'या' नंबरवर करावा लागणार मेसेज

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 14, 2023 04:58 PM IST

Mumbai Metro Ticket on Whatsapp : मुंबईतील मेट्रोच्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी मेट्रोने आता तिकीट मोबाइल वर देण्याची नवी योजना आणली आहे.

Mumbai Metro_HT
Mumbai Metro_HT

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी एक खुश खबरी आहे. प्रवाशांना आता तिकीट काढण्यासाठी रांगेत लागण्याची गरज राहणार नाही. या साठी मेट्रोने 'यात्री' हे अ‍ॅप् तयार केले असून या माध्यमातून प्रवाशांना मेट्रो आणि मोनो रेल्वेची माहिती मिळणार असून यावरुन तिकीट देखील काढत येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईत सध्या मेट्रो १ (घाटकोपर-वर्सोवा), मेट्रो २ अ (अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व) व मेट्रो ७ (गुंदवली ते दहिसर पूर्व), या तीन मेट्रो सेवा सुरू आहेत. तसेच मोनो रेल्वेसेवाही सुरू आहे. या मार्गावरील रेल्वे फेऱ्यानची माहिती प्रवाशांना मिळावी या साठी 'यात्री' अॅप तयार करण्यात आले आहे. यावर मेट्रो आणि मोनो रेल्वेचे वेळापत्रक टाकण्यात आले आहे. या सोबतच मेट्रो १चे तिकीट व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रवाशांना काढत येणार आहे. यासाठी त्यांना ९६७०००८८८९ या क्रमांकावर इंग्रजीत 'हाय' (hi) असा मेसेज पाठवावा लागणार आहे. त्यानंतर मेट्रो १कडून तिकीट काढण्याची लिंक पाठवण्यात येणार असून ही लिंक ५ मिनिटांपर्यंत कार्यरत राहणार आहे. या माध्यमातून जिथे जायचे आहे, त्या ठिकणांचे तिकीट प्रवाशांना काढत येणार असून यामुळे रांगेत राहण्याचा वेळ वाचणार आहे.

मेट्रोच्या वेळेत देखील बदल करण्यात आला आहे. मेट्रो २ अ व ७च्या अखेरच्या फेरीची वेळ रात्री उशिरा पर्यन्त करण्यात आली आहे. अंधेरी पश्चिमहून दहिसर पूर्वसाठी अखेरची फेरी रात्री १०.२०ऐवजी १०.३०ला तर गुंदवली ते डहाणूकरवाडी (दहिसर पूर्व मार्गे) अखेरची फेरीदेखील १०.३०ला करण्यात आल्याने प्रवसांची सोय होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग