मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune accident : अंधाराने केला घात! पुण्याजवळ भरधाव कारने महिलांच्या घोळक्याला उडवले, ५ ठार, १३ गंभीर

Pune accident : अंधाराने केला घात! पुण्याजवळ भरधाव कारने महिलांच्या घोळक्याला उडवले, ५ ठार, १३ गंभीर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 14, 2023 09:28 AM IST

Pune accident news : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिरोली गावाजवळ एका भरधाव वाहनाने महिलांच्या घोळक्याला धडक दिली. या घटनेत तब्बल ५ महिला या जागीच ठार झाल्या आहेत. तर १३ महिला या जखमी झाल्या आहेत. मृतांचा आडका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुण्याजवळ भरधाव कारने महिलांच्या घोळक्याला उडवले, ५ ठार
पुण्याजवळ भरधाव कारने महिलांच्या घोळक्याला उडवले, ५ ठार

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिरोली गावाजवळ पुणे नाशिक मार्गावर एका भरधाव वाहनाने महिलांच्या घोळक्याला धडक दिली. या घटनेत तब्बल ५ महिला या जागीच ठार झाल्या आहेत. तर १३ महिला या जखमी झाल्या असून त्यातील काहींची प्रकृती ही गंभीर आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. जखमी महिलांना पुण्यात आणि चाकण येथील दावख्यात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

सुशीला देढे, इंदुबाई कोंडीबा कांबळे ( वय ४६) अशी दोन मृत महिलांची नावे असून अन्य मृतांची नावे समजू शकली नाहीत. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार खेड तालुक्यातील खरपुडी फाट्यावर असणाऱ्या मंगल कार्यालयात स्वयंपाक करणाऱ्या या महिला होत्या. त्याच्या गटात तब्बल १८ महिला होत्या. या महिला पुणे नाशिक मार्गाने लग्न कार्यक्रमात वाढपी आणि स्वयंपाक कामासाठी आल्या होत्या. यावेळी या महिला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असल्याने त्या मंगलकार्यालयात जाण्यासाठी पुणे नाशिक महामार्ग ओलंडत होत्या. 

तब्बल १८ जणी रस्ता ओलंडत असतांना, पुण्याच्या दिशेकडून आलेल्या एका भरधाव वाहनाने या महिलांच्या घोळक्याला जोरात धडक दिली. यात पाच महिला या जागीच ठार झाल्या तर १३ महिला या जखमी झाल्या आहेत. या वेळी पोलिस देखील येथून जात होते. त्यांनी तातडीने जखमी महिलांना दवाखान्यात उपचारासाठी नेले. त्यांच्यावर चांडोली ग्रामीण रुग्णालयासह राजगुरूनगर परिसरातील चार ते पाच खासगी रुग्णालयात तर पुण्यातील काही रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

IPL_Entry_Point

विभाग