मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : धक्कादायक ! प्रियकराच्या त्रासामुळे तरुणीची आत्महत्या, प्रियकरासह दोघांच्या विरुद्ध गुन्हा

Pune Crime : धक्कादायक ! प्रियकराच्या त्रासामुळे तरुणीची आत्महत्या, प्रियकरासह दोघांच्या विरुद्ध गुन्हा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 03, 2023 07:11 AM IST

Pune Crime : पुण्यात प्रियकराच्या त्रासामुळे एका १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी प्रियकरासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime
Crime

पुणे : पुण्यात एका प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी प्रियकरासह दोघांना अटक करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Sharad Pawar: १५ दिवसांत २ राजकीय भूकंप; पहिला शरद पवारांची निवृत्ती, दुसरा कोणता? सुप्रिया सुळेंचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

प्रियकर प्रवीण पिडालथा (रा. आंध्रप्रदेश) आणि त्याची चुलतबहीण नॅन्सी पिडालथा (रा. घोरपडी) यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युवतीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रवीण आणि आत्महत्या केलेल्या १९ वर्षीय युवतीचे प्रेमसंबंध होते.

Sharad Pawar : अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर शरद पवार फेरविचार करणार, नेत्यांनी सुचवला 'हा' तोडगा

प्रवीण आणि नॅन्सी तिच्याकडे सारखी पैशांची मागणी करत होते. दरम्यान, त्यांना पैसे देण्यासाठी तरुणीने खर्चासाठी पैसे हवेत, असे सांगून आईकडून पैसे घेतले होते. हे पैसे तिने त्या दोघांना दिले होते. मात्र, आरोपींची पैशांची हाव वाढत गेली. दोघेही आरोपी तरुणीला पैशांसाठी धमकावत होते. समाजमाध्यमावर तिचे छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देत तिला आणखी पैशांशी मागणी केली. आरोपींच्या त्रासामुळे युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, सुरुवातीला या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. युवतीच्या आईने न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशाने प्रियकर प्रवीण आणि चुलतबहिण नॅन्सी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खरबडे तपास करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग