मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंड गणेश जाधवची हत्या, नागरिकांमध्ये दहशत

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंड गणेश जाधवची हत्या, नागरिकांमध्ये दहशत

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 22, 2022 08:19 AM IST

Thane Crime News Marathi : काही दिवसांपूर्वी ठाण्यात एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर आता ठाण्यात गोळ्या घालून एकाची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे.

Thane Crime News Marathi
Thane Crime News Marathi (HT_PRINT)

Thane Crime News Marathi : काही दिवसांपूर्वी ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर एका तरुणीसोबत रिक्षाचालकानं गैरवर्तन केलं होतं. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ती घटना ताजी असतानाच आता ठाण्यात गुंडांच्या एका टोळीनं कुख्यात गुंड गणेश जाधवची गोळ्या घालून हत्या केली आहे. त्यामुळं ठाणे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या या दोन घटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील नौपाडा आणि येऊर परिसरात काल भल्या पहाटे वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार झाल्याच्या घटना समोर आल्या. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी या गोळीबारात कुख्यात गुंड गणेश जाधव याची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं. नेहमीच वर्दळीच्या भागांमध्ये गोळीबार झाल्यानं ठाण्यात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

आपापसातील वादातून हत्या...

कुख्यात गुंड गणेश जाधवची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विपीन मिश्रा, सौरभ शिंदे आणि सुरज मेहरा या तीन आरोपींना वेगवेगळ्या भागातून अटक केली आहे. आपापसातील वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरू केला आहे.

IPL_Entry_Point