मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra News 22 October 2022 Live Updates Marathi Breaking News

Devendra Fadnavis - Eknath Shinde

Marathi News 22 October 2022 Live: 'आमदारांना खोके दिले, शेतकऱ्यांना पेट्या तरी द्या'

Marathi News Live Updates : आमदारांना खोके दिले, शेतकऱ्यांना पेट्या तरी द्या, असं म्हणत राज्यातील अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

Sat, 22 Oct 202211:03 AM IST

Eknath Shinde: दिवाळीनिमित्त राज्यातील नागरिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा

'दीपोत्सवाचं हे तेज सगळ्यांच्याच आयुष्यात चैतन्य आणि ऊर्जेचे पर्व घेऊन येवो. आपल्या आशा-आकांक्षांना पंख देणारे, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे क्षण घेऊन येवो,' अशा शुभेच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना दिवाळीनिमित्त दिल्या आहेत.

Sat, 22 Oct 202209:16 AM IST

PFI Ban News : पीएफआयच्या आणखी एका कार्यकर्त्याला नाशिकमधून अटक

PFI Banned In India : दहशतवाद्यांना फंडिंग आणि प्रशिक्षण दिल्याच्या आरोपांखाली केंद्रानं पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घातलेली आहे. तरीदेखील संघटेनेचा प्रचार व प्रसार करणाऱ्या पीएफआयच्या एका कार्यकर्त्याला तपास यंत्रणांनी नाशिकमधून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद आणि मालेगावातून पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.

Sat, 22 Oct 202208:03 AM IST

Shiv Sena vs BJP : आमदारांना खोके दिले, शेतकऱ्यांना पेट्या तरी द्या; चंद्रकांत खैरेंचा फडणवीसांना टोला

Shiv Sena vs BJP : आमदारांना खोके दिले, शेतकऱ्यांना पेट्या तरी द्या, असं म्हणत राज्यातील अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शिंदे-फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी, अशी मागणीही खैरेंनी केली आहे.

Sat, 22 Oct 202206:51 AM IST

Milind Narvekar: शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी केलं गृहमंत्री अमित शहा यांचं अभिष्टचिंतन

शिवसेनेचे सचिव व उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त ट्वीट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळं राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

Sat, 22 Oct 202204:39 AM IST

Covid: देशात मागील २४ तासांत २,११२ नव्या करोना रुग्णांची नोंद

करोनाचा संसर्ग कमी होत असून देशात मागील २४ तासांत २,११२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ३,१०२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या २४,०४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Sat, 22 Oct 202203:22 AM IST

Uddhav Thackreray : स्मार्टसिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे बुडवलं; ठाकरेंची फडणवीसांवर टीका

Uddhav Thackreray On Pune Rain : पावसामुळं सातत्यानं पुणे तुंबत असल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. पुणेकरांना स्मार्टसिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं शहरच बुडवलं असून पुण्याच्या दुरावस्थेला भाजपचं जबाबदार आहे. बुडणारे पुणे हा स्मार्ट सिटीचा पाणउतारा असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. गेली पाच वर्ष पुणे महापालिकेत भाजपची सत्ता होती, परंतु पुण्यातल्या पावसानं भाजपचा भोंगळ कारभार उघडा पाडल्याचंही खोचक टोला ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.

Sat, 22 Oct 202202:30 AM IST

Anant Ambani : मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Anant Ambani On Matoshree : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली आहे. अनंत अंबानी आणि उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली असून त्यांच्यात काय बोलणं झालं, याची माहिती अजून समोर आलेली नाही. परंतु आता या भेटीवरून राजकीय चर्चांना उधान आलं आहे.

Sat, 22 Oct 202201:37 AM IST

maharashtra rain : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान

maharashtra rain news today : राज्यात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. कालपासून अहमदनगर, नाशिक, पुणे, औरंगाबादसह जालना आणि बीड जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. कापूस, सोयाबीन आणि मका ही पिकं सततच्या पावसामुळं सडली आहे. त्यामुळं आता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे.

Sat, 22 Oct 202201:29 AM IST

Pakistan : एफएटीएफच्या ‘ग्रे’ यादीतून पाकिस्तान बाहेर, शरीफ सरकारला मोठा दिलासा

Pakistan : आर्थिक गैरव्यवहार आणि अतिरेक्यांना फंडिंग करणाऱ्या देशांवर लक्ष ठेवणारी संस्था फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सनं पाकिस्तानला तब्बल चार वर्ष ग्रे लिस्टमध्ये ठेवल्यानंतर या यादीतून बाहेर काढलं आहे. गेल्या काही वर्षात पाकिस्ताननं गैरव्यवहार विरोधी यंत्रणा सक्षम केली असून अतिरेक्यांना फंडिंग करणाऱ्यांविरोधात कारवाई केल्याचं फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सनं म्हटलं आहे.