मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Froud school in state : राज्यात ८०० बोगस शाळा; १०० शाळांना लागणार टाळे

Froud school in state : राज्यात ८०० बोगस शाळा; १०० शाळांना लागणार टाळे

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 07, 2023 08:04 AM IST

Froud school in Maharashtra : राज्यात शिक्षणाचा बाजार मांडण्यात आला आहे. यात तब्बल ८०० बोगस शाळा असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील १०० शाळांना टाळे ठोकन्यात येणार आहे.

School Admission
School Admission

पुणे : राज्यात तब्बल ८०० बोगस शाळा असल्याची माहिती पुढे आली आहे. या शाळा सीबीएसई, आयसीएसई, आयबी असून या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कामकाज सुरू होते. या शाळांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने यातील तब्बल १०० शाळा या बंद करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली.एवढेच नाही तर काही शाळांवर फौजदारी कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शिक्षण आयुक्त सुरज मांढरे म्हणाले, राज्यात अनधिकृतपणे चालणाऱ्या राज्य मंडळाच्या शाळांव्यतिरिक्त इतर १३०० शाळांची नुकतीच तपासणी करण्यात आली आहे. या शाळांची तपासणी शिक्षणाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली होती. या तपासणी मोहिमेत तब्बल ८०० शाळांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या.

यातील काही शाळांनी कागद पत्रात गंभीर त्रुटी ठेवल्या आहेत. या शाळांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. ना हरकत प्रमाणपत्र, संबंधित मंडळाचे मान्यता प्रमाणपत्र, राज्य सरकारकडून देण्यात येणारे इरादा पत्र या तीन कादगपत्रांची प्रमुख्याने पडताळणी या मोहिमेत करण्यात आली.

यापैकी एकही कागदपत्र नसल्यास, संबंधित शाळेची मान्यता रद्द केली जाणार आहे. मात्र, मान्यता रद्द केल्यानंतर, या शाळा न्यायालयाकडून दिलासा मिळवतात. त्यामुळे घाईने कारवाई न करता, शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांशी चर्चा करून ठोस कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात दिल्याचे सुरज मांढरे यांनी सांगितले. आतापर्यत शंभर शाळा बंद करण्यात आल्या असून, कारवाईची प्रक्रिया सुरुच राहणार आहे, असे देखील मांढरे म्हणाले.

IPL_Entry_Point

विभाग