मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune crime : धक्कादायक ! दहा डिलिव्हरी बॉयकडून डिलिव्हरी कंपनीला वीस लाख रुपयांचा गंडा

Pune crime : धक्कादायक ! दहा डिलिव्हरी बॉयकडून डिलिव्हरी कंपनीला वीस लाख रुपयांचा गंडा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 07, 2023 03:41 PM IST

Pune crime : जिओ मार्ट कंपनीकडून ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या वस्तू ग्राहकांना पोहोच न करता त्या दुसऱ्याच ग्राहकांना विक्री करून दहा डिलिव्हरी बॉयनी तब्बल २० लाख ७० हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.

Pune crime
Pune crime

पुणे : जिओ मार्ट कंपनीकडून ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या वस्तू ग्राहकांना पोहोच न करता त्या दुसऱ्याच ग्राहकांना परस्पर विक्री केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. दहा डिलिव्हरी बॉयनी या आपहारात कंपनीला तब्बल २० लाख ७० हजार रुपयांचा चुना लावला आहे. याप्रकरणी दहा जणांवर वारजे पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

याबाबत विनोद तात्या राखे (वय २७, रा. चिंबळी, पुणे )यांनी आरोपीं विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार महेश सोनवणे, मयूर कडू, प्रशांत कांबळे, आदित्य वाघमारे, अभिषेक साठे, अनंत करचे , ललित शिंदे, राज गुप्ता, महादेव कांबळे, सिद्धांत मराठे या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फसवणुकीचा हा प्रकार जानेवारी २०२३ पासून मार्च २०२३ पर्यंत शिवणे येथील दांगट इंडस्ट्रियल इस्टेट मधील अगरवाल गोडाऊन येथे घडला.

आरोपी हे डिलिव्हरी प्लस या कंपनीमध्ये काम करतात. कंपनीकडून मागील तीन महिन्यात ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या वस्तू ग्राहकांना पोहोच न करता, त्यांचा अपहर डिलिव्हरी बॉय यांनीच केला. संबंधित वस्तू त्यांनी दुसऱ्या ग्राहकांना विकल्या आणि त्याचे पैसे ऑफिसमध्ये जमा न करता एकूण १९ लाख ७२ हजार रुपयांच्या वस्तू आणि रोख ९८ हजार रुपये असा एकूण २० लाख ७० हजार रुपये किमतीचा त्यांनी अपहार केलेला आहे. याबाबत वारजे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस जवळगी पुढील तपास करत आहे.

 

IPL_Entry_Point

विभाग