मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Savarkar Gaurav Yatra : संपूर्ण राज्यात सावरकर गौरव यात्रा काढणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Savarkar Gaurav Yatra : संपूर्ण राज्यात सावरकर गौरव यात्रा काढणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 27, 2023 05:03 PM IST

Savarkar Gaurav yatra in Maharashtra : राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली की, राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरू करण्यात येणार आहे.आज सावरकरांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग, त्यांचं देशाप्रती असलेलं समर्पण सर्वांना माहितच आहे. सावरकर गौरव यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यातील शहरा शहरात काढली जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केल्याचं म्हणत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आहे.

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाचं योगदान दिलं. त्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. देशभक्तांच्या त्यागातून आणि बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याचा उपभोग आपण सगळे घेत आहोत. ज्या देशभक्तांनी स्वातंत्र्य मिळवलं त्यांचा अपमान जाणीवपूर्वक केला जातो आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांची लायकी आहे का?

राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून दाखवावं. मात्र ते तसं करणार नाहीत कारण त्यांच्याकडून ती अपेक्षाच नाही. ते सांगतात मी सावरकर नाही गांधी आहे. ते सावरकर होऊच शकत नाहीत त्यांची लायकीच नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.

 

त्यांच्या प्रतिमेला जोडे मारणार का?

वीर सावरकर यांचा अपमान मणिशंकर अय्यर यांनी केला होता तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते.रविवारच्या सभेत वीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणणारे अशी हिंमत दाखवणार का? राहुल गांधी यांच्या पुतळ्याला थोबाडीत मारणार का?तुम्ही वीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार? ते तरी सांगा असाही प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनाकेला आहे.

 

IPL_Entry_Point