मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Assembly Session : तुम्हाला मंत्रीपद हवंय का?, ठाकरे गटाच्या आमदाराला थेट फडणवीसांकडून ऑफर

Assembly Session : तुम्हाला मंत्रीपद हवंय का?, ठाकरे गटाच्या आमदाराला थेट फडणवीसांकडून ऑफर

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 19, 2022 04:12 PM IST

Maharashtra Assembly Session : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाच्या आमदाराला थेट मंत्रिपदाची ऑफर दिली आहे.

DCM Devendra Fadnavis Speech In Maharashtra Assembly Session In Nagpur
DCM Devendra Fadnavis Speech In Maharashtra Assembly Session In Nagpur (HT)

DCM Devendra Fadnavis Speech In Maharashtra Assembly Session In Nagpur : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली आहे. सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच हिवाळी अधिवेशन असल्यानं विरोधकांनी सरकारला घेरण्याचा जोरदार प्रयत्न केल्याचं दिसून आलं. परंतु गदारोळामुळं सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. परंतु सभागृहात आज कामकाज सुरू असताना शिंदे गटाच्या आमदाराला थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिपदाची ऑफर दिली. त्यामुळं सभागृहात एकच हशा पिकला. याशिवाय विरोधकांनीही याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर चिमटे काढले.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकं काय झालं?

शिंदे गटाचे आमदार सुनिल प्रभू यांनी यांनी सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांच्या बंगल्याला केलेल्या रंगरंगोटीचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. सभागृहात बोलताना ते म्हणाले की, विद्यमान सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नाही. तरीही हिवाळी अधिवेशनाच्या काळाता राज्यमंत्र्यांचे बंगले सजवण्यात आले आहेत. त्याची काहीही आवश्यकता नसताना ते का सजवण्यात आले?, प्रकल्पांना पैसा उभा करण्यासाठी सरकार कोट्यवधींचं कर्ज घेत असताना दुसऱ्या बाजूला पैशांचा चुराडा होत असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सुनिल प्रभू यांनी स्वत:च्याच सरकारवर केला.

शिंदे गटाचे आमदार सुनिल प्रभू यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात उभे राहिले. फडणवीस म्हणाले की, सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे, याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला नसते. अधिवेशनाच्या काळातही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांना तो अधिकार आहे. तुम्हाला मंत्रिपदाची संधी हवी आहे का?, असं म्हणत फडणवीसांनी आमदार प्रभूंना थेट मंत्रिपदाची ऑफर दिली. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

IPL_Entry_Point