FIFA WorldCup Final Celebration In Kolhapur : फ्रान्स आणि अर्जेंटिनामध्ये फिफा वर्ल्डकपची थरारक फायनल मॅच झाली. क्षणोक्षणी सामन्याचं चित्र पालटत असताना आणि अत्यंत चुरशीच्या सामन्यात अर्जेंटिनानं पेनल्टी शूट आऊटवर अखेरच्या क्षणी बाजी मारत दुसऱ्यांदा विजयी होण्याचं फ्रान्सचं स्वप्न धुळीस मिळवलं. त्यानंतर फुटबॉलवेड्या कोल्हापुरात तरुणाईनं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गर्दी करत एकच जल्लोष केला आहे. यावेळी तरुणांनी अर्जेंटिनाच्या विजयाच्या घोषणा दिल्या असून मेस्सीच्या पोस्टरला हार घालून दुग्धाभिषेक केला आहे. त्याचे व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.