मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Andhashraddha Nirmulan Samiti : तुमचाही दाभोळकर करू; श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी

Andhashraddha Nirmulan Samiti : तुमचाही दाभोळकर करू; श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 23, 2023 04:51 PM IST

shyam manav death threat : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळं राज्यात खळबळ उडाली आहे.

shyam manav death threat
shyam manav death threat (HT)

shyam manav death threat : दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या बागेश्वर बाबा उर्फ धिरेंद्र महाराज यांना अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी सर्वांसमोर जादू करून दाखवण्याचं आव्हान दिलं आहे. त्यामुळं आता श्याम मानव आणि धिरेंद्र महाराज यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. धिरेंद्र महाराज यांनी श्याम मानव यांचं आव्हान स्वीकारलं असून बागेश्वर आश्रमात येण्याची अट घातली आहे. तर दुसरीकडे श्याम मानव यांनी धिरेंद्र महाराज यांना महाराष्ट्रात येऊन जादू करून दाखवण्याचं आव्हान दिलं आहे. त्यानंतर आता श्याम मानव यांना अज्ञात आरोपींनी एसएमएसद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं आता नागपुरसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून श्याम मानव यांना सुरक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

दिव्यशक्ती असल्याचा दावा करणाऱ्या धिरेंद्र महाराज यांना अंनिसने दिव्यशक्ती सिद्ध केल्यास तीस लाख रुपयांचं बक्षीस देण्याचं आव्हान केलं होतं. त्यानंतर आता अज्ञात आरोपींनी श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्याम मानव यांचाही दाभोलकर करू, अशा आशयाचा मेसेज त्यांच्या मुलाला प्राप्त झाला आहे. त्यानंतर आता धिरेंद्र महाराजांच्याच भक्तांनी श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अंनिसचे महासचिव हरिष देशमुख यांनी केला आहे. त्यानंतर आता या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच धिरेंद्र महाराजांनी नागपुरात राम कथा आणि दिव्य दरबार भरवला होता. त्यावेळी त्यांनी दिव्यशक्तीचा दावा केला होता. त्यानंतर धिरेंद्र महाराज हे अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप अंनिसकडून करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही संस्थांच्या प्रमुखांमध्ये संघर्ष पेटलेला असतानाच आता श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळं त्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

IPL_Entry_Point