मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashok Chavan Join BJP : काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करणार, संजय शिरसाट यांचा नवा बॉम्ब

Ashok Chavan Join BJP : काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करणार, संजय शिरसाट यांचा नवा बॉम्ब

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 03, 2023 01:34 PM IST

Ashok Chavan Join BJP : काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य शिंदे गटाच्या नेत्यानं केलं आहे.

Ashok Chavan Join BJP
Ashok Chavan Join BJP (HT)

Ashok Chavan Join BJP : छत्रपती संभाजीनगर येथील महाविकास आघाडीची वज्रमुठ झाल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी थेट उद्धव ठाकरेंवर आरोप करत काँग्रेसवर नवा बॉम्ब टाकला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळं आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काही महिन्यांपूर्वीच अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ते भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. आता थेट सत्ताधारी शिंदे गटाकडूनच चव्हाण यांच्या भाजपप्रवेशाचा दावा करण्यात आल्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नाहीये. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांचं काही जमत नाही. इतकंच काय तर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचंही जमत नाही. या सर्व गोष्टी माध्यमांमध्ये आलेल्या आहेत. त्यामुळं आता लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच अशोक चव्हाण हे भाजपात प्रवेश करणार आहे. त्यांना काँग्रेसमध्ये योग्य वागणूक मिळत नसल्यानं ते निश्चितच भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.

विखे काँग्रेसमध्ये गेले तर थोरात भाजपात जातील- शिरसाट

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सध्या भाजपमध्ये जाणार नाहीत. कारण त्यांचं आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं विळ्या-भोपळ्याचं नातं आहे. राधाकृष्ण विखे पाटील जर पुन्हा काँग्रेसमध्ये आले तर बाळासाहेब थोरात भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असाही गौप्यस्फोट आमदार शिरसाट यांनी केला आहे.

IPL_Entry_Point