Mughal History Syllabus In CBSE board : सीबीएससी बोर्डाच्या अकरावीच्या पुस्तकांत असलेला इस्लाम आणि मुघलांचा इतिहास वगळण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. त्यामुळं आता अकरावीसह बारावीच्या विद्यार्थ्यांना मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. बारावीच्या वर्गात भारताचा इतिहास या पुस्तकातून दोन ते धडे वगळण्यात आले आहेत. त्यात इस्लामचा इतिहास, मुघल दरबार, संस्कृतीतील मतभेद आणि औद्योगिक क्रांती हे तीन धडे हटवण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षापासून हा अभ्यासक्रम पुस्तकातून वगळण्यात येणार असल्याचं उत्तर प्रदेश सरकारनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री योगी यांच्या निर्णयामुळं उत्तर प्रदेशात राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.
सीबीएससी बोर्डाच्या बारावीच्या पुस्तकात इस्लामचा इतिहास, मुघल हिस्ट्री तसेच औद्योगिकीकरण आणि शीतयुद्धाचे धडे होते. हा सर्व अभ्यासक्रम आता विद्यार्थ्यांना शिकवला जाणार नाहीये. आपल्या देशाला आपली संस्कृती आणि वारसा आहे. त्यामुळं आपला वारसा काय होता, हे आपण नव्या पिढीला शिकवायला हवं. पुरातन काळात लोक कोणत्या संस्कृतीत होते, हे विद्यार्थ्यांना अद्याप शिकवण्यात आलेलं नाही. त्यामुळं आम्ही मुघलांचा विषय वगळून भारतीय संस्कृतीसंदर्भातील विषय विद्यार्थ्यांना शिकवणार असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यातील अनेक ठिकाणांची नावं बदलण्यात आलेली आहे. त्यात आग्रा मुघल म्युझियम, मुघलसराय रेल्वे स्टेशन, अलाहाबादसह अन्य काही महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक ठिकाणांचा समावेश आहे. त्यानंतर आता सीबीएससी बोर्डाच्या इतिहासातून इस्लाम आणि मुघलांचा इतिहास वगळण्यात आल्यामुळं त्यावरून सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.