मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Strike : राज ठाकरेंच्या भेटीनंतर रिक्षाचालक भिडले; बोलू न दिल्यानं पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची

Pune Strike : राज ठाकरेंच्या भेटीनंतर रिक्षाचालक भिडले; बोलू न दिल्यानं पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 29, 2022 02:51 PM IST

Rickshaw Drivers Strike : विविध मागण्यांसाठी रिक्षाचालकांच्या संघटनांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. परंतु भेटीनंतर रिक्षाचालक संघटनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं.

Rickshaw Drivers Strike In Pune
Rickshaw Drivers Strike In Pune (HT)

Rickshaw Drivers Strike In Pune : पुणे शहरातील रिक्षाचालक संघटनांनी बेकायदा टॅक्सीचालकांविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. शहरातील बेकायदेशीर टॅक्सी बंद करण्याच्या मागणीसाठी रिक्षाचालकांच्या संघटनांनी आज आरटीओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. याशिवाय रिक्षाचालकांच्या प्रतिनिधींनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांना मागण्यांचं निवेदन दिलं आहे. यावेळी रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं.

ट्रेंडिंग न्यूज

रिक्षाचालकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरेंची राजमहाल या ठिकाणी भेट घेऊन त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. बैठक संपल्यानंतर आपल्याला राज ठाकरेंसमोर बोलू का दिलं नाही, असं म्हणत बाबा कांबळे यांनी केशव क्षीरसागर यांना जाब विचारला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. कांबळे आणि क्षीरसागर यांच्यात वाद वाढल्यानंतर दोन्ही पदाधिकांऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर उपस्थितांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संघटनेतील इतर पदाधिकाऱ्यांनी दोघांचीही समजूत काढल्यानंतर प्रकरण मिटलं.

दरम्यान पुण्यातील रिक्षाचालकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळवतो, असं आश्वासन दिलं आहे. यापूर्वी राज ठाकरेंनी अनेकांच्या समस्यांवर तोडगा काढला आहे. त्यामुळं आता त्यांनी रिक्षाचालकांचाही प्रश्न सोडवावा, अशी मागणी एका रिक्षाचालकानं ठाकरेंसमोर करताच ते उठताना म्हणाले की, आम्ही फक्त प्रश्न सोडवायलाच असतो, हे वाक्य ऐकताच उपस्थितांना हसू आवरेनासं झालं.

IPL_Entry_Point

विभाग