मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी खुद्द सीएम सरसावले! पवार, पटोले, राज ठाकरेंना फोन

Eknath Shinde : पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी खुद्द सीएम सरसावले! पवार, पटोले, राज ठाकरेंना फोन

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 05, 2023 10:49 AM IST

Pune Bypoll Election: पुण्यातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवार, नाना पटोले, राज ठाकरे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना फोन केला आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde

Eknath Shinde On Pune Bypoll Election: पुणे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. तर, महाविकास आघाडीनेही त्यांच्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहे. याशिवाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील पोट निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी विविध पक्षांतील नेत्यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यातील पोटनिवडणुक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नाना पटोले आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अजित पवार आणि जयंत पाटील यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने कसबा विधानसभा मतदारसंघातून हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर, चिंचवड मतदार संघातून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. तर, चिंचवड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. कसबा मतदारसंघातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, याबाबत पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. या दरम्यान राज ठाकरे शहर कार्यकारणीमधील नेत्यांची बैठक घेणार आहेत. तसेच यावेळी शहर कार्यकारणीने तयार केलेल्या कसब्यासाठीच्या इच्छुकांची यादी पाहणार आहेत. कसब्यातून मनसेकडून गणेश भोकरे, अजय शिंदे, गणेश सातपुते, आशिष देवधर आणि निलेश हांडे, प्रल्हाद गवळी, बाळा शेडगे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. पण राज ठाकरे कोणाच्या नावासमोर शिक्कामोर्तब करतात? हे लवकरच स्पष्ट होईल.

IPL_Entry_Point