Central Railway Megablock: मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनिस येथे सात दिवस मध्यरात्री (११ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारीपर्यंत) मेगाब्लॉक असणार आहे.या सात दिवसांत निरनिराळी कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, या मेगाब्लॉकमुळे लोकमान्य टिळक टर्मिनसमधून नियमित सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्स्प्रेस (१२१४१), लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस (२२५३८), लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्स्प्रेस (११०६१), विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस (२२८४७) या चार गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
१) लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्स्प्रेस (१२१४१) १२ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३५ वाजता सुटणारी १३ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.३० वाजता सुटेल.
२) लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस १३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२.३५ वाजता सुटणारी १३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १.२० वाजता सुटेल.
३) लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्स्प्रेस १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता सुटणारी १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:१५ वाजता सुटेल.
४) विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला १२ फेब्रुवारी रोजी ठाणे स्थानकावर अखेरचा थांबा असेल.
मध्य रेल्वेचे हे वेळापत्रक फक्त लोकमान्य टिळक टर्मिनिसवर सात दिवस मध्यरात्री घेण्यात आलेल्या मेगाब्लॉक पुरते मर्यादित असेल. त्यानंतर सर्व गाड्या त्यांच्या नियमित वेळेत सुटतील. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.