मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हृदयस्पर्शी.. पाळीव श्वानाने २ ट्रेकर्सच्या मृतदेहांचे जंगली प्राण्यांपासून २ दिवस केले संरक्षण

हृदयस्पर्शी.. पाळीव श्वानाने २ ट्रेकर्सच्या मृतदेहांचे जंगली प्राण्यांपासून २ दिवस केले संरक्षण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 10, 2024 03:28 PM IST

Himachal Pradesh News : बर्फावरून घसरून दरीत कोसळलेल्या दोन ट्रेकर्सचा हिमाचलमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या पाळीव कुत्र्याने दोन दिवस काहीही न खाता-पिता त्यांच्या मृतदेहांचे संरक्षण केले तसेच त्याच्या भुंकण्यामुळेच पोलीस मृतदेहाचा शोध घेऊ शकले.

Pet dog guards bodies of two trekkers
Pet dog guards bodies of two trekkers

श्वानांना माणसाचा सर्वात जवळचा मित्र तसेच निष्ठावान प्राण संबोधले जाते. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये पाळीव श्वानांनी आपला जीव धोक्यात घालून आपल्या मालकाचा जीव वाचवला आहे. आता अशाचा प्रकारची घटना हिमाचल प्रदेशमधून समोर आली आहे. येथे एका श्वानाने आपल्या मालकाच्या मृतदेहाचे दोन दिवस जंगली प्राण्यांपासून संरक्षण केले.

हिमाचल प्रदेशमधील बिलिंग दरीत कोसळून दोन टेकर्सचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह ४८ तासांनंतर त्यांच्या पाळीव कुत्र्यामुळे सापडला. मृत्यू झालेल्या दोन टेकर्सची ओळख पटली असून अभिनंदन गुप्ता (३०, शिवनगर पठाणकोट) आणि प्रणिता वाला (२६, पुणे, महाराष्ट्र) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॅलीमधून सोमवारपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह टेकऑफ पाईंटपासून तीन किलोमीटर खाली आढळला.

दोन दिवस त्यांच्या मृतदेहाजवळ बसून होता श्वान -

ही घटना धर्मशाळा जिल्ह्यातील बिलिंग खोऱ्यातील आहे. येथे पोलिसांना दोन लोकांचे मृतदेह मिळाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, २ दिवस हा कुत्रा काहीही न खाता-पिता आपल्या मालकाच्या मृतदेहाशेजारी बसून होता. तो ४८ तासाहून अधिक काळ आपल्या मालकाच्या मृतदेहाचे घनदाट जंगलात संरक्षण केले.

अभिनंदन व प्रणिता यांची मृत्यू बर्फावरून पडून झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

कुत्र्याच्या भुंकण्यामुळे मिळाले मृतदेह -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अभिनंदन याच्या भावाने तो बेपत्ता झाल्याची तक्रार कांगडा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांकडून शोध मोहीम राबवली गेली. दोघांचा शोध घेत असताना बचाव पथकाला जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. पोलिसांनी आवाजाच्या दिशेने जात मृतदेहांचा शोध घेतला. दोघांचे मृतदेह पॅराग्लायडर प्वाइंटपासून तीन किलोमीटर खाली रस्त्याच्या किनारी पडले होते.

प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की, या दोघांसोबत अन्य दोन तरुण-तरुणीही ट्रेकिंगसाठी गेले होते. मात्र खराब वातावरणामुळे ते परत फिरले. अभिनंदनला ट्रॅकची पूर्ण माहिती होती. त्यामुळे तो आपल्या मैत्रिणीसोबत पुढे गेले व हा अपघात झाला.

WhatsApp channel

विभाग