मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMC Election : मुंबई महापालिका निडणुकीसाठी शिवसेना-वंचितची आघाडी, जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला!

BMC Election : मुंबई महापालिका निडणुकीसाठी शिवसेना-वंचितची आघाडी, जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 03, 2023 09:06 PM IST

Shiv sena vanchit Bahujan aghadi alliance : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडीमध्ये युतीबाबत बोलणी झाल्याचे तसेच जागावाटपही ठरल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

शिवसेना-वंचितची आघाडी
शिवसेना-वंचितची आघाडी

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना व वंचितमध्ये आघाडीच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. त्यातच आज आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्याच युतीची बोलणी झाल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणूकशिवसेना-वंचितएकत्रितपणे लढणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकारांनी बोलताना ही माहिती दिली.

ट्रेंडिंग न्यूज

प्रकाश आंबडेकर यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीमधील महापालिका निवडणुकीत जागा वाटपाबाबतही भाष्य केले. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, शिवसेना ठाकरे गटासोबत युतीची चर्चा करण्याआधी आम्ही ८३ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. आता, शिवसेनेसोबत युतीची बोलणी झाल्यानंतर आता शिवसेना जितक्या जागा सोडेल त्यावर आम्ही आमचे उमेदवार देऊ असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत शिवसेना व वंचितची एक बैठक पार पडली त्यामध्ये युतीची बोलणी झाली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकींसाठी आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबतमहाआघाडीत सामील होण्यास तयार आहोत.  मात्र यासाठीराष्ट्रवादीचा उघड तर काँग्रेसचा छुपा विरोध आहे. त्यामुळे आघाडीचा निर्णय शिवसेनेने करायचा आहे. शिवसेनेसोबत केवळमहापालिका निवडणुकांबाबत युतीची बोलणी झाल्याचे आंबेडकर म्हणाले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या