मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला दिल्लीश्वरांचे पाय चाटायला शिकवलं नाही; अंबादास दानवेंचा फडणवीसांना टोला

शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला दिल्लीश्वरांचे पाय चाटायला शिकवलं नाही; अंबादास दानवेंचा फडणवीसांना टोला

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 10, 2022 04:08 PM IST

Shiv Sena vs BJP : शिवसेनेचं बोट धरून राज्यात भाजप मोठी झाली. परंतु शिवसेनेला फोडल्यानं देवेंद्र फडणवीसांची मान ऑलरेडी खाली गेलीय, असं म्हणत दानवेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

Ambadas Danve On Devendra Fadnavis
Ambadas Danve On Devendra Fadnavis (HT)

Ambadas Danve On Devendra Fadnavis : निवडणूक आयोगानं शिवसेनेचं पक्षचिन्ह असलेलं धनुष्यबाण गोठवलं आहे. त्यानंतर आता शिंदे गट आणि ठाकरे गटानंही पसंतीक्रमांचे चिन्ह निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. परंतु आता याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. त्यामुळं आता अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ठाकरे गट आणि भाजपमध्ये राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

निवडणूक चिन्हाच्या प्रकरणावर आणि राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत फडणवीसांनी मान वर करून बोलू नये, असं म्हणत दानवेंनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. शिवसेनेनं महाराष्ट्रातील मराठी माणसाला ताठ मानेनं जगायला शिकवलं आहे. शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला दिल्लीश्वरांचे पाय चाटायला शिकवलेलं नाही, त्यामुळं फडणवीसांनी शिवसेनेला ताठ मानेनं भाषा करण्याची गरज नाही, असं सांगत अंबादास दानवेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

मागच्या तीन वर्षांपासून शिवसेना फोडण्याचा प्रयत्न...

शिवसेनेच्या ताकदीवर राज्यात भारतीय जनता पक्षाचा विस्तार झाला. शिवसेनेचं बोट धरून हे राज्यात मोठे झाले. परंतु गेल्या तीन वर्षांपासून यांनी शिवसेना फोडण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळं आता देवेंद्र फडणवीसांनी मान ऑलरेडी खाली गेलीय. त्यांनी बोलूच नये, असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

अब्दुल सत्तार ही एक विकृती- दानवे

२०१९ च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत आलेल्या आणि त्यानंतर आता शिंदे गटात सहभागी झालेल्या मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही अंबादास दानवेंनी टीका केली आहे. ते म्हणाले की, अब्दुल सत्तार ही एक विकृती आहे. ही विकृती कुठेही गेली तर असंच वागणार आहे, असं म्हणत त्यांनी अब्दुल सत्तार यांनाही टोला लगावला.

IPL_Entry_Point