मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aurangabad Garbage Depot fire: औरंगाबादच्या कचरा डेपोत भीषण आग; ३६ तासांनंतर आगीवर नियंत्रण

Aurangabad Garbage Depot fire: औरंगाबादच्या कचरा डेपोत भीषण आग; ३६ तासांनंतर आगीवर नियंत्रण

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 23, 2023 09:35 AM IST

Aurangabad Garbage Issue: औरंगाबाद येथील कचरा डेपोतील कचऱ्याला मोठी आग लागली. तब्बल ४८ तासांपासून ही आग धुमसत होती. ३६ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

Aurangabad Garbage Depot fire
Aurangabad Garbage Depot fire

औरंगाबाद : औरंगाबाद येथे असणाऱ्या कचरा डेपोला भीषण आग लागली. तब्बल ४८ तासांपासून ही आग धुमसत असून तब्बल ३६ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीमुळे औरंगाबाद येथील कचरा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कचरा प्रश्नावरून औरंगाबाद येथे काही वर्षांपूर्वी मोठी दंगल झाली होती. हा मुद्दा देश पातळीवर चर्चिला गेला होता. दरम्यान, यावर काही आश्वासने देऊन तोडगा काढण्यात आला होता. दरम्यान ही प्रकरण शांत झाले असतांना आता पडेगाव येथे असणाऱ्या महापालिकेच्या कचरा प्रक्रिया केंद्रातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास कचराडेपोतील ढिगाऱ्याला आग लागली. पाहता-पाहता आग वाढत गेली. 

आगीचे लोळ उठल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान महापालिकेचे घनकचरा कक्षप्रमुख उपायुक्त विभाग तथा सोमनाथ जाधव यांनी तातडीने कचराडेपोवर धाव घेत अग्निशमन विभागाचे तीन बंब घटनास्थळी बोलावून घेतले. अग्निशमनच्या तीन बंबांनी रात्रभर पाण्याचा मारा सुरू ठेवला. त्यासोबतच मनपाचे तीन टँकरदेखील आणण्यात आले होते.

ही आग तब्बल ४८ तास धूमसत होती. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तब्बल ३६ तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. पडेगाव येथे कचरा प्रक्रिया केंद्रात लागलेली आग ही सुरवातीला छोटी होती. मात्र, यानंतर आगीने उग्र रूप धारण केले. मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठले होते. कर्मचाऱ्यांनी पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण आगीने उग्र रूप धरण केलए होते. तब्बल ३५ टँकर पाण्याचा मारा करण्यात आल्यावर आग आटोक्यात आली.

IPL_Entry_Point

विभाग