मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aurangabad Fire : औरंगाबादमध्ये अग्नीतांडव; शहागंज कपडा मार्केटमध्ये भीषण आग, अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल

Aurangabad Fire : औरंगाबादमध्ये अग्नीतांडव; शहागंज कपडा मार्केटमध्ये भीषण आग, अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 15, 2023 03:43 PM IST

Aurangabad Fire News : औरंगाबाद येथील शहागंज कपडा मार्केटमध्ये भीषण आग लागली असून यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Aurangabad Fire News
Aurangabad Fire News

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात आज दुपारच्या सुमारास येथील शहागंज कपडा मार्केटमध्ये भीषण आग लागली. आग एवढी तीव्र होती की दुरून आगीचे लोट दिसत होते. या घटनेत हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

औरंगाबाद येथील शहागंज परिसरात कपडा मार्केट हा गजबजलेला परिसर आहे. आज दुपारच्या सुमारास आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या तसेच पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही. येथील न्यु फॅशन होलसेल कापड दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील गोडाऊनमध्ये ही आग लागली. आगीने काही क्षणात उग्र रूप धारण केले. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी औरंगाबाद महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे सात बंब दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या ठिकाणी जिल्हाभरातून नागरिक खरेदीसाठी येत असतात. आग मोठी असल्याने ती आजूबाजूच्या दुकानांना देखील लागण्याची शक्यता आहे. यामुळे व्यापाऱ्यांमद्धे भीतीचे वातावरण आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग